RERA कायद्यात बदल, बिल्डरला आता १ फ्लॅट एकालाच विकता येणार, ग्राहकांची फसवणूक टळणार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2021 08:48 PM2021-04-09T20:48:13+5:302021-04-09T20:49:20+5:30
RERA Act : एका बिल्डरला एक प्लॅट अनेकांना विकून फसवणूक करता येणार नसल्याचे जितेंद्र आव्हाड म्हणाले.
मुंबई : घर खरेदी करणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. आता यापुढे घर खरेदी करताना बिल्डकरांकडून ग्राहकांची फसवणूक होणार नाही. कारण, रेरा (RERA) कायद्यात महत्वाचा बदल करण्यात आला आहे. याबाबतची माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. (RERA Act changed, builder can now sell 1 flat alone, avoid customer fraud)
आता यापुढे कुठल्याही विकासकाला एक फ्लॅट अनेकांना विकून फसवणूक करता येणार नाही. यापूर्वी फसवणुकीच्या अशा अनेक घटना घडल्या आहेत. त्यात एक बिल्डर एकच प्लॅट अनेकांना विकतो. कालांतराने तो फ्लॅट विकत घेणाऱ्याला आपली फसवणूक झाल्याचं कळते. तो अनेक ठिकाणी दाद मागायला जातो. असे अनेल लोक आमच्याकडेही येतात. पण कायद्यात याबाबत काहीच तरतूद नसल्यामुळे त्यावर कारवाई होऊ शकत नव्हती, असे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. तसेच, आता आता RERA कायद्यात बदल करण्यात आला आहे. त्यामुळे एका बिल्डरला एक प्लॅट अनेकांना विकून फसवणूक करता येणार नसल्याचे जितेंद्र आव्हाड म्हणाले.
सांगितल्याप्रमाणे RERA कायद्यात बदल केला असून यापुढे कुठल्याही विकासकाला एक फ्लॅट अनेक जणांना विकून फसवणूक करता येणार नाही. कायद्यातच बदल केल्याने कायद्याच्या चौकटीत आता विकासकांना राहावेच लागेल. RERA चे Controlling Authority श्री. अजोय मेहता यांचे आभार! pic.twitter.com/zxpS2Apamj
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) April 9, 2021
याचबरोबर, एखादा प्लॅट विकल्यानंतर आता त्याची संपूर्ण माहिती बिल्डरला RERA कायद्यानुसार ऑनलाईन करणे बंधनकारक असणार आहे. त्यामुळे एखादा प्लॅट कुणाला विकला गेला आहे, याची माहिती उपलब्ध असणार आहे. कायद्यातील या बदलामुळे ग्राहकांची होणारी फसवणूक टळणार आहे. अशा प्रकरणाची फसणवूक करण्याचा प्रयत्न झाल्यास बिल्डरला कायद्यातील बदलानुसार अटक केली जाऊ शकते. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची होणारी फसवणूक आता टळणार असल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.