वन्य प्राण्यांसाठी रेस्क्यू बाइक्स

By admin | Published: February 25, 2016 03:08 AM2016-02-25T03:08:24+5:302016-02-25T03:08:24+5:30

जंगलामध्ये जखमी वन्यप्राण्याची सुरक्षित सोडवणूक करण्यासाठी आता रेस्क्यू बाईकची मदत घेतली जाणार आहे. अशा दोन रेस्क्यू बाईक्स आज वनविभागाच्या ताब्यात देण्यात आल्या आहेत.

Rescue Bikes for Wildlife | वन्य प्राण्यांसाठी रेस्क्यू बाइक्स

वन्य प्राण्यांसाठी रेस्क्यू बाइक्स

Next

मुंबई : जंगलामध्ये जखमी वन्यप्राण्याची सुरक्षित सोडवणूक करण्यासाठी आता रेस्क्यू बाईकची मदत घेतली जाणार आहे. अशा दोन रेस्क्यू बाईक्स आज वनविभागाच्या ताब्यात देण्यात आल्या आहेत.
वनसंरक्षकाबरोबरच वन्यप्राण्यांच्या सुरक्षिततेसाठी माय व्हेट या चॅरिटेबल ट्रस्टच्या डॉ. मधुरिता गुप्ता यांनी दोन रेस्क्यू बाईक्सची निर्मिती केली आहे. या बाईक्सचे उदघाटन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी केले व बाईक्सच्या चाव्या वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे सुर्पूत केल्या.
यावेळी आ. सुरेश धोटे, वन विभागाचे सचिव विकास खारगे, माय व्हेट चॅरिटेबल ट्रस्टच्या डॉ. गुप्ता आणि इतर मान्यवर उपस्थित होते. या रेस्क्यू बाईक्समुळे मनुष्य आणि वन्यप्राणी यांच्यातील संघर्षादरम्यानची परिस्थिती हाताळण्यास मदत होणार आहे. जंगलामध्ये गस्त घालण्याबरोबरच वेगवेगळ्या परिस्थितीत या बाईक्सचा उपयोग करता येईल.
कशा आहेत बाईक्स?
३६० अंशामध्ये निरिक्षण करता येईल अशा या बाईक्स असून बाईक्सला सर्व बाजूंनी लोखंडी जाळी बसवली आहे.त्यामुळे वन्यजीवांच्या हल्ल्यापासून संरक्षण होण्यास मदत होणार असून वाहनाचे संतुलन व्यवस्थित राहील याची दखलही घेण्यात आली आहे. बाईकला चारही बाजूंनी एल.ई.डी दिव्यांची व्यवस्था आहे. त्यामुळे गस्त घालतांना चारीबाजूंनी निगराणी ठेवता येईल. या बाईक्समध्ये डार्टगन, पाण्याची बाटली, औषधाचे किट, ब्लो पाईप, दोरखंड ठेवण्याची व्यवस्था आहे. दोन आसनी बाईकचा वापर अडचणीत असलेल्या वन्यप्राण्याला जवळ जाऊन मदत करण्यासाठी, त्याला बधीर किंवा बेशुद्ध करण्यासाठी करता येईल. वन्यप्राण्यांचे सर्वेक्षण तसेच संनियंत्रण करण्यासाठी, राष्ट्रीय उद्यान तसेच अभयारण्य किंवा वन्यजीवांची संख्या अधिक असणाऱ्या क्षेत्रात या बाईक्सचा उपयोग होईल. (प्रतिनिधी)

Web Title: Rescue Bikes for Wildlife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.