मलेशियात अडकलेल्या ठाण्यातील विद्यार्थ्यांची सुटका

By admin | Published: August 13, 2014 03:09 AM2014-08-13T03:09:50+5:302014-08-13T03:09:50+5:30

मलेशियात बेकायदा वास्तव्य केल्याबद्दल अडकेलल्या १९ भारतीय विद्यार्थ्यांचा मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा झाला

Rescued students in Thane, stuck in Malaysia | मलेशियात अडकलेल्या ठाण्यातील विद्यार्थ्यांची सुटका

मलेशियात अडकलेल्या ठाण्यातील विद्यार्थ्यांची सुटका

Next

ठाणे : मलेशियात बेकायदा वास्तव्य केल्याबद्दल अडकेलल्या १९ भारतीय विद्यार्थ्यांचा मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा झाला असून त्यांच्यासाठी तेथील सरकारने विशेष पासपोर्टसह तिकिट व अन्य कागदपत्रांची पूर्तता केली आहे. हे सर्व विद्यार्थी १४ आॅगस्टच्या मध्यरात्री मायदेशी परतणार असून यात ठाण्यातील तीन विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
ठाण्यातील एसईएस कॉलेजचे संचालक मिलींद कोळी हे या विद्यार्थ्यांना मायदेशी घेऊन येण्यास मलेशियामध्ये आहेत. त्यांनी सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता केली असून मलेशियन कायद्यानुसार आवश्यक दंडाची सर्व रक्कम भरली आहे. हा सर्व खर्च तेथील हाय कमिशनने उचलला आहे, असे ते सर्व उद्या भारतात येणार असल्याचे महाविद्यालयाचे संचालक सुरेश काळे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Rescued students in Thane, stuck in Malaysia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.