औषधी वनस्पतीच्या संवर्धनासाठी संशोधन
By admin | Published: September 21, 2014 02:19 AM2014-09-21T02:19:01+5:302014-09-21T02:19:01+5:30
औषधनिर्मितीसाठी वापरल्या जात असलेल्या ‘सलई’ (बोस्वेलिया) या दुर्मीळ होत चाललेल्या वृक्षाच्या संवर्धनासाठी ग्रामीण भागातील एका प्राध्यापकाने संशोधन सुरू केले आहे.
Next
राहुल शिंदे - पुणो
आशिया खंडातील काही ठरावीक देशांत आढळणा:या आणि जगभरात विविध प्रकारच्या औषधनिर्मितीसाठी वापरल्या जात असलेल्या ‘सलई’ (बोस्वेलिया) या दुर्मीळ होत चाललेल्या वृक्षाच्या संवर्धनासाठी ग्रामीण भागातील एका प्राध्यापकाने संशोधन सुरू केले आहे.
पश्चिम घाटातील डोंगरउतारावर सापडणा:या या औषधी वनस्पतीचे जैव अभियांत्रिकीच्या साह्याने उतिसंवर्धन करून तिची संख्या वाढविण्यासाठी काय करता येईल, या संदर्भातील संशोधन प्रकल्प केंद्राच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाच्या (डीएसटी) विज्ञान व अभियांत्रिकी संशोधन मंडळाला सादर करण्यात येणार आहे.
सावित्रीबाई फुले पुणो विद्यापीठाशी संलग्न असलेल्या शिरूर येथील चांदमल ताराचंद (सी. टी.) बोरा कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या वनस्पतिशास्त्र विभागातील सहायक प्राध्यापक डॉ. विकास नायकवडी यांना या संशोधनासाठी डीएसटीकडून युवा शिष्यवृत्ती मिळाली आहे. त्यांना बोस्वेलिया या दुर्मीळ होत चाललेल्या वृक्षाच्या संवर्धनासंदर्भातील संशोधनासाठी युवा शिष्यवृत्ती जाहीर झाली आहे.
रुजण्याचे प्रमाण अल्प; लुप्त होण्याची भीती
च्सलई या वनस्पतीच्या डिंकापासून ‘धूप’ तयार केला जातो; परंतु वनस्पतीपासून अधिक प्रमाणावर डिंक मिळावा, म्हणून या वनस्पतीच्या खोडाला जखम केली जाते.
च्मोठी जखम केल्यास ही वनस्पती नष्ट होते. त्यात जमिनीमध्ये या वनस्पतीच्या बिया रुजण्याचे प्रमाण कमी आहे.
च्त्यामुळे ही वनस्पती लोप पावण्याच्या मार्गावर आहे. औषधी वनस्पतींचे संवर्धन करणो महत्त्वाचे आहे, असे नायकवडी यांनी सांगितले.
जगभरात विविध
औषधांची निर्मिती
च्नायकवडी म्हणाले की, सलई ही वनस्पती भारत, पाकिस्तान, येमेन, दक्षिण आफ्रिका व ओमान या देशांत आढळते. परंतु, केवळ डोंगरउतारावरच ही वनस्पती वाढत असल्यामुळे अलीकडच्या काळात दुर्मीळ होत चालली आहे.
च्भारतात बिहार, मध्य प्रदेश व ओडिशा या राज्यांसह महाराष्ट्रात पश्चिम घाटात खंबाटकी, सज्जनगड आदी ठिकाणी ती आढळते. या वनस्पतीपासून औषधांची निर्मिती केली जाते.
च्प्रामुख्याने आयुर्वेदिक आणि युनानी पद्धतींमध्ये सलईपासून तयार केलेल्या औषधांचा उपयोग संधिवात, मूत्रशयाचे आजार, फुप्फुसाचे विकार आदींसाठी केला जातो.