शिशिरा, मोंटाना इमारतींतील खोल्यांत पुन्हा सर्च आॅपरेशन

By admin | Published: February 24, 2015 04:15 AM2015-02-24T04:15:53+5:302015-02-24T04:15:53+5:30

चार जणांनी आत्महत्या केलेल्या अंधेरीच्या लोखंडवाला संकुलातील शिशिरा व मोंटाना इमारतीमध्ये ओशिवरा पोलिसांनी पुन्हा सर्च आॅपरेशन सुरु केले

Researches in search rooms in Shishira, Montana buildings | शिशिरा, मोंटाना इमारतींतील खोल्यांत पुन्हा सर्च आॅपरेशन

शिशिरा, मोंटाना इमारतींतील खोल्यांत पुन्हा सर्च आॅपरेशन

Next

मुंबई : चार जणांनी आत्महत्या केलेल्या अंधेरीच्या लोखंडवाला संकुलातील शिशिरा व मोंटाना इमारतीमध्ये ओशिवरा पोलिसांनी पुन्हा सर्च आॅपरेशन सुरु केले आहे. आत्महत्येनंतर या चौघांच्या मृतदेहाजवळ जे ध्वनिचित्रण सापडले आहे, ते वारंवार पाहिल्यानंतर हे चारही मयत एखादी स्क्रिप्ट वाचावी, त्याप्रमाणे बोलत असल्याचे भासत आहे. त्यामुळे ती स्क्रि प्ट किंवा पत्रांचा शोध सध्या पोलीस घेत आहेत.
सोमनाथ पाल (२०), त्याची बहिण भारती (२५), आई शिख (४५) आणि तिचा लिव्ह इन पार्टनर मनोज पटेल (५५) या चौघांचेही मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत पोलिसांना शिशिरा आणि मोंटाना इमारतीच्या खोल्यांमध्ये सापडले. सोबत मृत्युपूर्वी लिहिलेले पत्र आणि मोबाईल ध्वनिचित्रणही सापडली आहे. तपास अधिकाऱ्यांनुसार पोलिसांना या दोन्ही इमारतीच्या खोल्यांमध्ये अशा प्रकारचा मजकूर लिहिलेले पत्र किंवा तत्सम गोष्ट आढळलेली नाही. त्यामुळे हे चौघे नक्की कशामध्ये पाहून हे वाचन करीत आहेत. त्यांनी समोर एखादे पत्र लिहून नंतर त्याचे वाचन मोबाईलसमोर केले आहे का? याचा शोध सध्या पोलिस घेत आहेत. या ठिकाणी लिहिलेली पत्र जर पोलिसांना सापडली, तर त्यावरील हस्ताक्षर नेमके कोणाचे आहे? याचीही चौकशी केली
जाईल. याप्रकरणाचा सर्वच
बाजूने तपास केला जात असल्याचे तपास अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Researches in search rooms in Shishira, Montana buildings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.