बाळंतिणीच्या मृत्यूनंतर नातेवाइकांचा आक्रोश
By admin | Published: August 2, 2016 03:09 AM2016-08-02T03:09:44+5:302016-08-02T03:09:44+5:30
टेम्भोडे च्या आंबेडकर नगर येथील कविता अजय जाधव (३४) यांना प्रसूती साठी पालघरच्या प्रशानु क्लीनिक मध्ये दाखल करण्यात आले
पालघर : टेम्भोडे च्या आंबेडकर नगर येथील कविता अजय जाधव (३४) यांना प्रसूती साठी पालघरच्या प्रशानु क्लीनिक मध्ये दाखल करण्यात आले असताना तिचे डॉक्टरांच्या हलगर्जी पणाने मृत्यू झाल्याचा आरोप करीत जो पर्यंत डॉक्टर विरोधात गुन्हा दाखल होत नाही तो पर्यंत आपण हटणार नसल्याचे जाहीर करीत तिच्या नातेवाईकांनी पालघर पोलीस स्टेशनला गराडा घातला.
पालघर जवळील टेम्भोडे येथील कविता यांना प्रसूतीसाठी ३० जुलै रोजी पालघरच्या डॉक्टर प्रशानू कोटी यांच्या क्लीनिक मध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांची मध्यरात्री १२.१५ वाजल्या नंतर कविता जाधव यांची नॉर्मल प्रसूती होऊन त्यांना मुलगी झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.परंतु नंतर काही कालावधी नंतर डॉक्टरांनी त्यांना मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत आहे असे नातेवाईकांना सांगितले व त्याच वेळेच्या सुमारास पहाटे ५ पर्यंत तिच्यावर उपचार करत असताना तिची गर्भाशयाची पिशवी काढण्यात आल्याचे नातेवाईकांनी सांगितले.
या नंतरही तिचा रक्तस्राव थांबत नसल्याचे कारण पुढे करत तात्काळ पुढच्या उपचारा साठी मुंबईला हलवावे लागेल असे डॉक्टरांनी सांगितले. तिला ३१ जुलै रोजी सकाळी ९ च्या दरम्यान मुंबईला नेण्याचे ठरले असताना वाटेतच डॉ.कोटी यांनी मुंबईला नेण्याचा निर्णय बदलून सिल्वासा येथील विनोबा भावे रु ग्णालयात घेऊन गेल्याचे तक्र ारी अर्जात म्हटले आहे. त्या ठिकाणी तिला रक्त पुरवठा उपचार करत असताना तिचे त्या ठिकाणी काल निधन झाले. (प्रतिनिधी)
>कारवाईचे आश्वासन
नातेवाईकांचा आक्रोश लक्षात घेऊन शेवटी उपविभागीय पोलीस अधिकारी जयंत बजबले यांनी पोलीस स्टेशनमध्ये येऊन अकस्मात गुन्ह्याची नोंद करून तपासा अंती दोषींवर कारवाई केली जाईल असे आश्वासन त्यांनी जमावाला दिले.