१७५ पदांचे आरक्षण जाहीर
By admin | Published: June 9, 2017 01:00 AM2017-06-09T01:00:19+5:302017-06-09T01:00:19+5:30
भोर व वेल्हे तालुक्यातील १७५ पोलीस पाटीलपदांच्या भरतीसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
भोर : भोर व वेल्हे तालुक्यातील १७५ पोलीस पाटीलपदांच्या भरतीसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली. या पदांसाठी ६ जूनपासून भरतीप्रक्रिया सुरू होत आहे. लेखी व तोंडी परीक्षेद्वारे ही निवड करण्यात येणार असल्याचे उपविभागीय अधिकारी मौसमी बर्डे यांनी सांगितले.
या वेळी वेल्हे तहसीलदार पी. डी. उबाळे, गटविकास अधिकारी संतोष हराळे, नायब तहसीलदार बाळासोा शिरसाट, जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल आवाळे, उपसभापती लहू शेलार, पोलीसपाटील संघाचे अध्यक्ष विठ्ठल खोपडे व नागरिक उपस्थित होते.
भोर तालुक्यात एकूण १९३ पोलीसपाटीलपदे असून त्यापैकी १०० पदे रिक्त होती, तर वेल्हेत ९३ पैकी ७५ पदे अशी एकूण २९६ पदांपैकी १७५ पदे रिक्त होती. त्या सर्व पदांची आरक्षण सोडत काढण्यात आली. त्यात महिलांच्या ८० पदांचा समावेश आहे. या पदासाठी १० वी पास, वय २५ च्यावर आणि ४५ दरम्यानचे असावे. गावचा रहिवासी अशी अट ठेवण्यात आल्याचे मौसमी बर्डे यांनी सांगितले.
आरक्षण गावनिहाय याप्रमाणे :
अनुसूचित जाती): वरोती खु, भांबटमाळ, दापसरे, करंजगाव, उंबरे, रायरी, कसेडी, भोलावडे, विंझर, कासुर्डी खे. बा, देगाव, चांदवणे, निधान, जयतपाड, गोंडखल, आळंदे, काळेवाडी, बारे खु, रानवडी, कोर्ले, सांगवी हि. मा, वेल्हे खु, कोळेवाडी, धानवली, भांड्रवली, जाधववाडी, धिंडली, आंबेगाव खु, इंगवली, मालवली, राजापूर, कातवडी, आंबेगाव बु, साईव बु, बालवड, करंदी खे. बा.
अनुसूचित जाती महिला : शिवनगरी, साळव, निगडे मोसे, आसनी मंजाई, वर्वे बु, खामगाव, वागजवाडी, नीळकंठ, धांगवडी, पान्हवळ, खोपी, चादर, नांदघुर, खोपडेवाडी, नाझरे, करंजे, पिंपरी, शिरकोली.
विशेष मागास प्रवर्ग महिला : पिशवी, वरोडी डाय
विशेष मागास प्रवर्ग : म्हाळवडी, वरसगाव, वांजळवाडी, दिवळे.
विमुक्त जाती अ : धानेप, वावेघर, कोलंबी, दापोडे, चिखलावडे खु.
विमुक्त जाती अ महिला : निगुडघर, गुगुळशी, सांगवीतर्फे भोर.
भटक्या जाती ब : हिरपोडी, किवत, राजघर, घोल, निवी, घोडखल.
भटक्या जाती ब महिला : कोळवडी, भालवडी.
भटक्या जाती क : सोनवडी, घिसर, बार्शीमाळ.
भटक्या जाती क महिला : नांदगाव, करंदी बु, वेणुपुरी.
भटक्या जाती ड : सुरवड, आसणी दामगुडा, माळेगाव, धावडी.
भटक्या जाती ड महिला : कोंढावळे खुर्द, देवघर.
इतर मागास प्रवर्ग : पाल बु, म्हाकोशी, बसरापूर, खानु, कुडली खु, सांगवी खु, वडगाव झांजे, कानंद, कामथडी, रुळे, रावडी, कारुंगण, निगडे बु, वरोती बु, ठाणगाव, कुर्तवडी, सोडे माथना, वडघर, कांजळे, सोंडे, हिरोजी, भोंगवली, म्हसखुर्द, वाठार हि. मा, अंगसुळे, घावर, पेंजळवाडी, कुरवटी.
इतर मागास प्रवर्ग महिला : राजिवडी, दुर्गाडी, कुंड, पांगारी, उंबार्डे, हरिश्चंद्री, कांबेगी, कोंढवली, आंबवणे, अभेपुरी, मोहरी खुर्द, मोहरी, करंदी खु, चिखलावडे बु., माजगाव, नानावळे.
सर्वसाधारण महिला : आंबाडे, दीडघर, दापकेधर, शेनवड गुढे, भट्टीवागदरा, पाल खुर्द, कर्नवडी, वरोडी बु, चऱ्हाटवाडी, माजगाव, आपटी, हातनोशी, माझेरी, सोडे, कार्ला, टेकपोळे, पोळे, चिरमोडी, कर्नावडी, नायगाव, कुडली बु, जोगवडी, हारपुड, निवंगण, मोरवाडी, ब्राम्हणघर वे. खो, एकलगाव, आंबेड, मांगदरी, पोम्बर्डी, फणशी, जांभळी, वरोडी खु.
सर्वसाधारण खुला : लव्हेरी, पऱ्हर बु, वाकांबे, सांगवी बु, बोपे, पारवडी, केतकावणे, निगडे खु.