आरक्षणातून रेल्वेच्या तिजोरीत ६ कोटींची भर

By admin | Published: November 10, 2016 06:29 AM2016-11-10T06:29:01+5:302016-11-10T06:29:01+5:30

५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला आणि या निर्णयामुळे रेल्वेच्या तिजोरीत चांगलाच गल्ला जमा झाला

Reservation covers 6 crores of railway tracks | आरक्षणातून रेल्वेच्या तिजोरीत ६ कोटींची भर

आरक्षणातून रेल्वेच्या तिजोरीत ६ कोटींची भर

Next

मुंबई : ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला आणि या निर्णयामुळे रेल्वेच्या तिजोरीत चांगलाच गल्ला जमा झाला. या नोटा चलनात आणण्यासाठीही अनेकांनी मेल-एक्स्प्रेसमधील सर्वात वरच्या श्रेणीचे तिकीट काढणे पसंत केले. त्यामुळे यातून मुंबई, कोलकाता, दिल्ली आणि मद्रास रेल्वेच्या तिजोरीत मिळून ६ कोटी ५३ लाख ४९ हजार ७२४ रुपयांची भर पडली. मात्र, मेल-एक्स्प्रेसचे तिकीट मिळवताना सुट्या पैशांअभावी प्रवाशांना वेटिंगवर राहावे लागत होते. मुंबईतून ८ नोव्हेंबर रोजी ४२ हजार ५८७ तिकिटे आरक्षित करण्यात आली होती. यातून ४ कोटी २८ लाख ६९ हजार ५0२ रुपये उत्पन्न रेल्वेला मिळाले होते. हाच आकडा बुधवारी पाहिला असता, ३९ हजार ८८२ तिकिटे आरक्षित झाली आणि ६ कोटी ५७ लाख ९४ हजार ९७0 रुपये रेल्वेच्या तिजोरीत जमा झाले. दिल्ली विभागातही हीच परिस्थिती होती. मंगळवारी ४२ हजार २0३ तिकिटे आरक्षित होतानाच, ३ कोटी ७४ लाख ५0 हजार ८८३ रुपये उत्पन्न मिळाले, तर बुधवारी हेच उत्पन्न ३८ हजार ६३३ तिकीटांतून ५ कोटी ६३ लाख ५ हजार एवढे मिळाल्याची माहिती रेल्वेकडून देण्यात आली. (प्रतिनिधी)

Web Title: Reservation covers 6 crores of railway tracks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.