मुंबई महापालिका निवडणुकीसाठी 3 ऑक्टोबरला आरक्षण सोडत

By admin | Published: August 22, 2016 06:04 PM2016-08-22T18:04:30+5:302016-08-22T18:04:30+5:30

उल्हासनगर महानगरपालिकेसाठी 30 सप्टेंबर, बृहन्मुंबई महानगरपालिकेसाठी 3 ऑक्टोबर रोजी आरक्षण सोडत काढण्यात येईल.

The reservation for the municipal corporation elections on October 3 | मुंबई महापालिका निवडणुकीसाठी 3 ऑक्टोबरला आरक्षण सोडत

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी 3 ऑक्टोबरला आरक्षण सोडत

Next

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. २२ - उल्हासनगर महानगरपालिकेसाठी 30 सप्टेंबर, बृहन्मुंबई महानगरपालिकेसाठी 3 ऑक्टोबर; तर उर्वरित ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, नाशिक, अकोला, अमरावती व नागपूर महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 7 ऑक्टोबर 2016 रोजी आरक्षण सोडत काढण्यात येईल. त्यानंतर प्रभाग रचना व आरक्षणाबाबत हरकती व सूचना दाखल करता येतील, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी केली आहे.
 
आरक्षण आणि प्रभाग रचनेबाबत बृहन्मुंबईसाठी 5 ते 20 ऑक्टोबर; तर उर्वरित महानगरपालिकांसाठी 10 ते 25 ऑक्टोबर 2016 या कालावधीत संबंधित महानगरपालिकेत हरकती व सूचना दाखल करता येतील.
 
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरामधील श्रीमंत अशा महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्व प्रभागांची पुनर्रचना व आरक्षणा  संदर्भातील कार्यक्रमाची घोषणा राज्य निवडणूक आयोगाने घोषित केली आहे. तसे पत्र राज्य निवडणूक आयोगाचे अवर सचिव नि. व. वागले यांनी काढले आहे.
 
मुंबई महानगरपालिकेची निवडणुक फेब्रुवारी 2017 मध्ये होत आहे. निवडणुकीपूर्वी प्रभाग रचनांची पुनर्रचना आणि अनुसूचित जाती, जमाती व इतर मागासवर्ग प्रभागांबाबत 9 सप्टेंबरला प्रस्ताव तयार केला जाणार आहे. हा प्रस्ताव 16 सप्टेंबरला कोकण आयुक्त, जिल्हाधिकारी आणि आयुक्तांना सादर केल्यावर आरक्षण बाबत बैठक होणार आहे. 23 सप्टेंबर ला या प्रस्तावाला निवडनुक आयोग मान्यता देणार असून 27 सप्टेंबरला मागासवर्ग व महिला प्रभागाचे आरक्षण काढण्यासाठी जाहिर नोटिस प्रसिद्ध केली जाणार आहे.
 
3 ऑक्टोबरला अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्ग व महिला आरक्षित प्रभागांची सोडत काढली जाणार आहे. 5 ऑक्टोबरला महिला व आरक्षित प्रभागांच्या सोडतीची तसेच प्रभाग रचनेची अधिसूचना राज्य सरकारच्या राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. 5 ते 10 ऑक्टोबर दरम्यान प्रभाग रचनेबाबत हरकती व सूचना मागवल्या जाणार आहेत. 5 नोव्हेंबरला सुचना व हरकतीवर सुनवाई घेऊन 18 नोव्हेंबरला सुचना व हरकतींवर निर्णय घेतला जाणार आहे. 22 नोव्हेंबरला प्रभाग रचना, अधिसुचना व नकाशामधे योग्य ते बदल करून अंतिम अधिसूचना राजपत्रात प्रसिद्ध केली जाणार आहे.

Web Title: The reservation for the municipal corporation elections on October 3

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.