मुस्लिम व मराठा समाजाला आरक्षण ?
By admin | Published: June 10, 2014 07:13 PM2014-06-10T19:13:07+5:302014-06-10T19:14:16+5:30
विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारने मराठा व मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याचा प्रस्ताव मार्गी लावण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.
ऑनलाइन टीम
मुंबई, दि. १० - विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारने मराठा व मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याचा प्रस्ताव मार्गी लावण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. यानुसार मुस्लिम समाजाला ४ टक्के तर मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्यात येईल अशी माहिती सूत्रांनी दिली.
लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर राज्यातील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या आघाडी सरकारने महत्त्वाचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याची तयारी सुरु केली आहे. मराठा व मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जात आहे. राज्य सरकारने ही मागणी मान्य करत दोन्ही समाजाला आरक्षण देण्याची तयारी दर्शवल्याचे वृत्त आहे. याबाबत येत्या आठवड्याभरात अधिकृत घोषणा होईल असे सांगितले जाते. हे दोन्ही प्रश्न मार्गी लावण्याची मागणी दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली होती.