जिल्हा परिषद अध्यक्षपदांचे आरक्षण जाहीर
By admin | Published: June 11, 2016 04:31 AM2016-06-11T04:31:09+5:302016-06-11T04:31:09+5:30
राज्यातील ३४ जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदांचे आरक्षण शुक्रवारी जाहीर करण्यात आले.
मुंबई : राज्यातील ३४ जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदांचे आरक्षण शुक्रवारी जाहीर करण्यात आले. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहात चिठ्ठ्या टाकून सोडत पद्धतीद्वारे जिल्हा परिषदांचे आरक्षण निश्चित करण्यात आले. यावेळी सर्वपक्षीय प्रतिनिधी उपस्थितीत होते. जिल्हा परिषदांच्या सध्याच्या आरक्षणाचा कालावधी संपुष्टात आल्यानंतर हे नवीन आरक्षण लागू होईल. राज्यातील ३४ जिल्हा परिषदांचे आरक्षण पुढील प्रमाणे -
अनुसूचित जाती- अमरावती, भंडारा, अनुसूचित जाती (महिला) - नागपूर, हिंगोली ; अनुसूचित जमाती - पालघर, वर्धा; अनुसूचित जमाती (महिला) - नंदुरबार, ठाणे, गोंदिया; नागरिकांचा मागास प्रवर्ग - अकोला, उस्मानाबाद, धुळे, पुणे; नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) - जळगाव, बुलढाणा, औरंगाबाद, परभणी, यवतमाळ; खुला प्रवर्ग - चंद्रपूर, गडचिरोली, नांदेड, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, बीड, सांगली, जालना; खुला प्रवर्ग (महिला) - सातारा, रत्नागिरी, नाशिक, रायगड, अहमदनगर, सोलापूर, लातूर, वाशीम. (प्रतिनिधी)