नगरपंचायत अध्यक्षपदांचे आरक्षण जाहीर

By admin | Published: November 10, 2015 02:39 AM2015-11-10T02:39:44+5:302015-11-10T02:39:44+5:30

राज्यात अलीकडे निवडणूक झालेल्या १०० नगर पंचायतींच्या अध्यक्षपदाचे आरक्षण आज जाहीर झाले. नगरविकास राज्यमंत्री डॉ.रणजीत पाटील यांच्या उपस्थितीत मंत्रालयात त्या बाबतची सोडत करण्यात आली

Reservation of the post of Nagar Panchayat has been announced | नगरपंचायत अध्यक्षपदांचे आरक्षण जाहीर

नगरपंचायत अध्यक्षपदांचे आरक्षण जाहीर

Next

मुंबई : राज्यात अलीकडे निवडणूक झालेल्या १०० नगर पंचायतींच्या अध्यक्षपदाचे आरक्षण आज जाहीर झाले.
नगरविकास राज्यमंत्री डॉ.रणजीत पाटील यांच्या उपस्थितीत मंत्रालयात त्या बाबतची सोडत करण्यात आली. आजच्या सोडतीनुसार ५४ नगर पंचायतींचे अध्यक्षपद खुल्या प्रवर्गासाठी, २७ ठिकाणचे अध्यक्षपद ओबीसींसाठी, १३ अध्यक्षपदे अनुसूचित जातींसाठी तर ६ ठिकाणचे अध्यक्षपद अनुसूचित जमातींसाठी राखीव झाले आहे.
अध्यक्षपदाचे आरक्षण असे -
अनुसूचित जाती (महिला) - तिवसा, माळशिरस, अर्जुनी, सावली, लाखांदूर, नायगाव.
अनुसूचित जाती (खुले) - साकोली, भिवापूर, माढा, समुद्रपूर, मालेगाव जहांगीर, सडक अर्जूनी, चाकूर.
अनुसूचित जमाती (महिला) - धडगाव वडफाळ्या, सुरगाणा, झरी जामणी.
अनुसूचित जमाती (खुले) - भामरागड, पेठ, मुलचेरा.
ओबीसी राखीव (महिला) - पारनेर, बाभूळगाव, मोहाडी, शहापूर, देवरी, अहेरी, धानोरा, वडवणी, लाखनी, वाशी, देवणी, साक्री, लोहारा बुद्रुक.
ओबीसी राखीव (खुला) - फुलंब्री, शिरुर कासार (बीड), आंैढा नागनाथ, मोहोळ, जळकोट, अक्कलकुवा, कसई दोडामार्ग, म्हसाळा, कुही, राळेगाव, गोंडपिंपरी, दिंडोरी, संग्रामपूर, लोणंद.
खुला प्रवर्ग (महिला) - हिंगणा, देवळा, शिरुर अंतरपाळ (लातूर), मोताळा, जाफ्राबाद, भातकुली, पाटोदा, घनसावंगी, चामोर्शी, मानोरा, तळा, जामखेड, बार्शी टाकळी, मारेगाव, कारंजा लाड, बदनापूर, चाकण, गोरेगाव, मंडणगड, कळवण, एटापल्ली, खालापूर, पोलादपूर, धारणी, चिमूर, मंठा, कोरपना, सालेकसा.
खुला प्रवर्ग - शेवगाव, माहागाव, सेलू (वर्धा), हिमायतनगर, कर्जत (अहमदनगर), आष्टी (बीड), नांदगाव खंडेश्वर, चांदवड, कुरखेडा, कळंब, पालम, सेनगाव, निफाड, सिरोंचा, वाभावे वैभववाडी. अकोले, मुरबाड, पोंभूर्णा, कोरची, सोयगाव, जिवती, आरमोरी, माणगाव, आष्टी (वर्धा), आमगाव, कुडाळ.
(विशेष प्रतिनिधी)

Web Title: Reservation of the post of Nagar Panchayat has been announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.