आरक्षण कायम राहावे हीच संघाची भूमिका, कॉंग्रेसकडून भ्रामक प्रचार सुरू असल्याचा संघाचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2018 11:50 PM2018-05-06T23:50:56+5:302018-05-06T23:50:56+5:30

आरक्षण कायम रहावे या भूमिकेचा पुनरुच्चार करत राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर टीकास्त्र सोडण्यात आले आहे. कॉंग्रेस पक्ष व राहुल गांधी सातत्याने संघाविरोधात चुकीचा प्रसार करत आहेत, असा आरोप संघातर्फे करण्यात आला आहे.

reservation should be maintained - RSS | आरक्षण कायम राहावे हीच संघाची भूमिका, कॉंग्रेसकडून भ्रामक प्रचार सुरू असल्याचा संघाचा आरोप

आरक्षण कायम राहावे हीच संघाची भूमिका, कॉंग्रेसकडून भ्रामक प्रचार सुरू असल्याचा संघाचा आरोप

Next

नागपूर - आरक्षण कायम रहावे या भूमिकेचा पुनरुच्चार करत राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर टीकास्त्र सोडण्यात आले आहे. कॉंग्रेस पक्ष व राहुल गांधी सातत्याने संघाविरोधात चुकीचा प्रसार करत आहेत, असा आरोप संघातर्फे करण्यात आला आहे. यासंदर्भात संघाचे सहसरकार्यवाह डॉ.मनमोहन वैद्य यांनी पत्रक जारी केले आहे.
कॉग्रेसच्या ‘फेसबुक पेज’वरुन माझ्या आणि सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांच्याविरोधात भ्रामक प्रचार सुरू आहे. संघाला अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीचे आरक्षण संपवायचे आहे, असा दावा कॉंग्रेसकडून करण्यात येत आहे. ही बाब तथ्यहीन व खोटी आहे.  कॉंग्रेसच्या या राजकारणाचा आम्ही निषेध करतो. राहुल गांधी यांनी यासंदर्भात अधिकृत संदर्भ किंवा पुरावे सादर करावे, असे आव्हानच डॉ. वैद्य यांनी दिले आहे. हिंदू समाजातील सामाजिक भेदभावामुळेच अनुसूचित जाती- जमातीच्या नागरिकांना संविधानाच्या माध्यमातून आरक्षण प्राप्त झाले आहे. संघाचीदेखील हीच भूमिका आहे. संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेतदेखील वेळोवेळी याबाबत मंथन झाले आहे. समाजातून सामाजिक भेदभाव संपुष्टात यावा व समरसता निर्माण व्हावी यासाठी संघ कटिबद्ध व कार्यरत आहे, असेदेखील डॉ. वैद्य यांनी प्रतिपादन केले आहे.

Web Title: reservation should be maintained - RSS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.