राज्यातील १२ लाख टन साखरेचा होणार राखीव साठा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2019 10:56 AM2019-07-25T10:56:05+5:302019-07-25T10:58:43+5:30

गेली २ वर्षे देशात विक्रमी ३३०-३३५ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे.

Reserve 12 lakh tonnes sugar in the state | राज्यातील १२ लाख टन साखरेचा होणार राखीव साठा

राज्यातील १२ लाख टन साखरेचा होणार राखीव साठा

Next
ठळक मुद्देसाखर उद्योगाला दिलासा : तरीही देशात शंभर लाख टन साखर राहील शिल्लकदेशातील साखरेचे उत्पादन ३३० वरून २८५ लाख टनांवर घसरण्याचा अंदाजदेशात सुमारे १०० लाख टन साखर पुढील हंगामातही शिल्लक राहणार

पुणे : केद्र सरकारने जाहीर केलेल्या राखीव साठा (बफर स्टॉक) योजनेमुळे राज्यातील साखर कारखान्यांना १२ लाख टन साखरेचा साठा करता येणार आहे. या साखरेचे व्याज, विमा आणि गोदामाच्या खर्चापोटी कराव्या लागणाऱ्या खर्चाचा परतावा कारखान्यांना केंद्र सरकारकडे मागता येईल. त्यामुळे राज्यातील साखर कारखानदारीला काहीसा दिलासा मिळणार आहे. मात्र, तरीही देशात १०० लाख टन साखर ऑक्टोबर २०२०मधे शिल्लक राहण्याची दाट शक्यता आहे. 
गेली २ वर्षे देशात विक्रमी ३३०-३३५ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. त्यामुळे ऑक्टोबर २०१८मधे नवीन हंगाम सुरू होताना तब्बल १०४ लाख टन साखरेचा साठा शिल्लक होता. मे महिन्यात संपलेल्या हंगामातही (२०१८-१९) देशात ३३० आणि राज्यात सलग दुसऱ्या वर्षी १०७ लाख टन साखरेचे उत्पादन झाले. देशाचा वार्षिक खप साधारण २६० लाख टन इतका असून, राज्यात ३० ते ३५ लाख टन साखर खपते. यंदाच्या वर्षी १३९ ते १४० लाख टन साखर क्टोबरअखेरीस शिलकी राहील. साखरेला उठाव नसल्याने साखर उद्योगासमोर मोठा प्रश्न निर्माण झाला होता. यातून मार्ग काढण्यासाठी साखरेचा बफर स्टॉक करण्याची मागणी साखर संघटनांकडून होत होती. 
शिल्लक साखरेच्या प्रश्नामुळे देशात १ ऑगस्ट २०१९ ते ३१ जुलै २०२०पर्यंत ४० लाख टन साखरेचा बफर स्टॉक करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. साधारण त्यातील ३० टक्के वाटा राज्याला मिळेल. म्हणजेच राज्याच्या वाट्याला येणारी १२ लाख टन साखर प्रत्येक कारखान्याला वाटून दिली जाईल. वाट्याला येणारा साखरेचा कोटा कारखान्यांना बाजूला काढावा लागेल. या साखरेच्या प्रमाणात विमा, कर्जाचे व्याज यांचा परतावा केंद्र सरकारकडून मिळेल. त्यासाठी दर ३ महिन्यांनी कारखान्यांना परताव्यासाठी अर्ज करावा लागेल. 

......
* देशातील साखरेचे उत्पादन घसणार?
‘गेल्या वर्षी असलेला बफर स्टॉकचा कोटा ३० वरून ४० लाख टनांवर वाढविण्यात आला आहे. त्यामुळे स्थानिक बाजारातील दरात सुधारणा होईल. शेतकऱ्यांनादेखील ऊसबिलाची रक्कम देता येणे कारखान्यांना शक्य होईल. उसाच्या रास्त आणि किफायतशीर दरात २०१८-१९ या वर्षांत भरघोस वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे २०१९-२० या हंगामामधे मागील वाढीव दर कायम करण्याचा केंद्राचा निर्णय अपेक्षित होता,’ अशी प्रतिक्रिया राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी दिली. 
..........
 आगामी ऊस गाळप हंगामामधे देशातील साखरेचे उत्पादन ३३० वरून २८५ लाख टनांवर घसरण्याचा अंदाज आहे. गेल्या मॉन्सूनमधे महाराष्ट्राकडे पावसाने पाठ फिरविल्याने ऊस क्षेत्रात ११.५४ लाख हेक्टरवरून ८.२३ लाख हेक्टरपर्यंत घट झाली आहे. त्यामुळे राज्यातील साखरेचे उत्पादन १०७ वरून ७० लाख टनांपर्यंत खाली घसरेल. त्याचा फटका देशातील एकूण उत्पादनाला बसेल. गेल्या हंगामातील (२०१८-१९) १३९ ते १४० लाख टन साखर शिल्लक राहील. देशातील साखरेचा खप २०६ लाख टन असून, ६० ते ६५ लाख टन साखर  आगामी हंगामात निर्यात होईल. ही आकडेवारी लक्षात घेतल्यास देशात सुमारे १०० लाख टन साखर पुढील हंगामातही शिल्लक राहील.
........

Web Title: Reserve 12 lakh tonnes sugar in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.