रेश्मा भोसले यांना भाजपाची उमेदवारी
By admin | Published: February 6, 2017 04:58 PM2017-02-06T16:58:42+5:302017-02-06T18:03:34+5:30
घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालयातील निवडणूक निर्णय अधिकारी विजया पांगारकर यांनी रेश्मा भोसले यांना भाजपची उमेदवारी मंजूर करण्यास नाकारले होते.
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 6 - घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालयातील निवडणूक निर्णय अधिकारी विजया पांगारकर यांनी रेश्मा भोसले यांना भाजपची उमेदवारी मंजूर करण्यास नाकारले होते. त्यावर महापालिका आयुक्तांनी निवडणूक आयोगाकडे मार्गदर्शन मिळावे, असे पत्र पाठवले होते.
राज्य निवडणूक आयोगाचे सचिव यांनी या संपूर्ण कागदपत्रांची पडताळणी करून रेश्मा भोसले यांना भाजपाची उमेदवारी देण्यात यावी, असा निर्णय घेतला आणि तसे पत्र पालिका आयुक्तांना आज पाठविले. त्यानुसार भोसले यांना भाजपाचे कमळ हे चिन्ह देऊन आज दुपारी सर्वात शेवटी प्रभाग क्र. 7 ड च्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली. पुण्यात सर्वात शेवटी प्रसिद्ध झालेली ही उमेदवारांची यादी आहे. केवळ याच निर्णयासाठी याद्या प्रसिद्ध करण्यास विलंब लावण्यात आल्याची चर्चा शहरात सुरू झाली आहे.
रेश्मा भोसले यांनी घड्याळाचे चिन्ह मागितले होते व भाजपाचा एबी फार्म दिला होता. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिका-यांनी भाजपाचे चिन्ह गोठविले होते. आम्ही निवडणुकीला कधीही तयार आहोत. पण भाजपाला हुकूमशाही पद्धतीने सत्ता काबीज करायची असेल तर आम्ही राजीनामा द्यायला तयार आहोत. आता आम जनताच त्याला उत्तर देईल. मुख्य निवडणूक आयुक्तांना आम्ही पक्षाच्या वतीने पत्र देणार आहोत. एका माणसासाठी जर बदल करत असतील तर हाच निक़ष सर्वांना लावावा. मागील महापालिका निवडणुकीत मालमत्ता कराबाबत दोन अधिकारी निलंबित झाले होते. यावेळी, कोणते अधिकारी निलंबित होतील ते पाहावे लागेल, असं वक्तव्य काँग्रेसच्या दत्ता बहिरट यांनी केलं आहे.