निवासी डॉक्टर असुरक्षितच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2015 01:40 AM2015-07-20T01:40:56+5:302015-07-20T01:40:56+5:30

जुलै महिन्याच्या सुरुवातीला तीन दिवस निवासी डॉक्टरांनी सुरक्षेचा प्रश्न आणि इतर महत्त्वाच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात, यासाठी मासबंक केला होता.

Resident Doctor Unprotected | निवासी डॉक्टर असुरक्षितच

निवासी डॉक्टर असुरक्षितच

Next

मुंबई : जुलै महिन्याच्या सुरुवातीला तीन दिवस निवासी डॉक्टरांनी सुरक्षेचा प्रश्न आणि इतर महत्त्वाच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात, यासाठी मासबंक केला होता. मासबंक संपून अवघे १५ दिवस उलटल्यानंतर पुण्याच्या निवासी डॉक्टरला मारहाण झाल्याचा प्रकार शनिवारी रात्री घडला. या प्रकारानंतर राज्यातील चार हजार निवासी डॉक्टर अजूनही असुरक्षित असल्याचे स्पष्ट झाले आहे.
जानेवारी ते जुलै या कालावधीत सुमारे १० निवासी डॉक्टरांना मारहाण झाल्याच्या घटना घडल्या. यामुळेच मध्यवर्ती मार्ड संघटनेने निवासी डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही लावावेत, वेगळे सुरक्षा रक्षक द्यावेत अशी मागणी केली होती. पुढील पाच महिन्यांत हे काम पूर्ण होईल असे आश्वासन देण्यात आले आहे. पण, एखाद्या डॉक्टरला मारहाण झाल्यास गुन्हा दाखल करताना डॉक्टर संरक्षण कायद्यांतर्गत करावा, अशीही मागणी केली होती. पण, पुण्याच्या निवासी डॉक्टरला मारहाण झाल्यानंतर डॉक्टर संरक्षण कायद्याविषयीच्या माहितीची मागणी चक्क पोलिसांकडून करण्यात आली. त्यामुळे या कायद्याविषयी अजूनही अनभिज्ञता असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुण्यात निवासी डॉक्टर गुन्हा नोंदवायला गेले तेव्हा पोलिसांनी कायद्याची प्रत द्या, असे निवासी डॉक्टरांना सांगितले. पोलिसांना प्रत देऊनही त्यांनी त्याअंतर्गत गुन्हा दाखल केला नसल्याची माहिती मध्यवर्ती मार्ड संघटना अध्यक्ष डॉ. सागर मुंदडा यांनी दिली.

Web Title: Resident Doctor Unprotected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.