राज्यभरातील निवासी डॉक्टरांचा संप मागे

By admin | Published: March 22, 2017 07:05 PM2017-03-22T19:05:11+5:302017-03-22T19:12:44+5:30

रुग्णांच्या नातेवाईकांकडून होणा-या मारहाणी विरोधात संप पुकारलेल्या निवासी डॉक्टरांनी अखेर आपला संप मागे घेतला आहे. आज रात्री आठ वाजल्यापासून कामावर रुजू होणार आहेत.

Resident doctors across the state retreat | राज्यभरातील निवासी डॉक्टरांचा संप मागे

राज्यभरातील निवासी डॉक्टरांचा संप मागे

Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 22 - रुग्णांच्या नातेवाईकांकडून होणा-या मारहाणी विरोधात संप पुकारलेल्या निवासी डॉक्टरांनी अखेर आपला संप मागे घेतला आहे. आज रात्री आठ वाजल्यापासून कामावर रुजू होणार आहेत.
राज्यभरातील रुग्णालयात डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी 1100 सुरक्षा रक्षक तैनात करण्यात येतील, असे आश्वासन राज्य सरकारकडून देण्यात आल्यानंतर निवासी डॉक्टरांनी संप मागे घेतला. याबाबतची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे. दरम्यान, रुग्णालयात डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी असणारे सुरक्षा रक्षक हे  21 ते 24 वयोगटातील असणार आहेत. 
याआधी दुपारी राज्य सरकारकडून आज रात्री आठ वाजेपर्यंत कामावर रुजू व्हा, अन्यथा 6 महिन्यांच्या पगार कापला जाईल, असा इशारा निवासी डॉक्टरांना राज्य सरकारकडून देण्यात आला होता.
याचबरोबर मुंबई उच्च न्यायालयानेही निवासी डॉक्टरांना मंगळवारी फैलावर घेतले होते. स्वत:च्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सामान्यांना वेठीस धरू नका. अन्य डॉक्टर काम करत आहेत, तुम्हालाच कशी भीती वाटते? कामावर रुजू व्हा अन्यथा नोकरी सोडा, अशा शब्दांत त्यांना खडसावले होते. 
 

 

Web Title: Resident doctors across the state retreat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.