निवासी डॉक्टराचा डेंग्यूने मृत्यू

By admin | Published: November 9, 2016 05:40 AM2016-11-09T05:40:56+5:302016-11-09T05:40:56+5:30

कळवा येथील छत्रपती शिवाजी रुग्णालयातील नेत्रचिकित्सा विभागातील निवासी डॉक्टर डॉ. दिलीप कणसे (२६) यांचा मंगळवारी डेंग्यूने मृत्यू झाला.

Resident doctor's dengue death | निवासी डॉक्टराचा डेंग्यूने मृत्यू

निवासी डॉक्टराचा डेंग्यूने मृत्यू

Next

ठाणे : कळवा येथील छत्रपती शिवाजी रुग्णालयातील नेत्रचिकित्सा विभागातील निवासी डॉक्टर डॉ. दिलीप कणसे (२६) यांचा मंगळवारी डेंग्यूने मृत्यू झाला. डॉ. कणसे हे कळवा रुग्णालयातील नेत्रचिकित्सा विभागात निवासी डॉक्टर म्हणून वर्षभरापासून कार्यरत होते. मूळचे लातूरचे रहिवासी असलेल्या कणसे यांनी एमबीबीएसचे शिक्षण घेतले होते. पदव्युत्तर शिक्षणासाठी ते कळवा येथे आले होते. नेत्रचिकित्सक होण्याचे त्यांचे स्वप्न होते. त्यामुळे कळवा रुग्णालयात नोकरीबरोबरच त्यांचे शिक्षणही सुरू होते. ते सध्या रुग्णालयाच्या वसतिगृहातच वास्तव्यास होते. ताप येऊ लागल्याने त्यांना २५ आॅक्टोबरला कळवा रुग्णालयात दाखल केले होते. परंतु, प्रकृती खालावल्याने त्यांना २६ तारखेला खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच मंगळवारी त्यांचा मृत्यू झाला. दुसरीकडे पाचपाखाडी भागात राहणारे काँग्रेसचे नगरसेवक नारायण पवार यांनाही डेंग्यूची लागण झाली असून, त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे.
आतापर्यंत ३३२ रुग्ण
पावसाळ्यानंतरही ठाण्यात डेंग्यूच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. आतापर्यंत शहरात ३३२ जणांना डेंग्यूची लागण झाल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागातील सूत्रांनी दिली आहे.

Web Title: Resident doctor's dengue death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.