निवासी डॉक्टरांच्या मानसिक आरोग्याची तपासणी करावी
By admin | Published: October 25, 2015 01:46 AM2015-10-25T01:46:26+5:302015-10-25T01:46:26+5:30
निवासी डॉक्टरांचे अधिक कामाचे तास, झोप नीट न मिळणे, खाण्या-पिण्याच्या अनियमित वेळा, अभ्यासाचा ताण आणि त्यातच त्यांच्यावर होणाऱ्या हल्ल्यांमुळे असणारी भीती
मुंबई : निवासी डॉक्टरांचे अधिक कामाचे तास, झोप नीट न मिळणे, खाण्या-पिण्याच्या अनियमित वेळा, अभ्यासाचा ताण आणि त्यातच त्यांच्यावर होणाऱ्या हल्ल्यांमुळे असणारी भीती या सगळ्याचा परिणाम निवासी डॉक्टरांच्या मानसिक आरोग्यावर होत आहे. निवासी डॉक्टरांवरचा मानसिक ताण लक्षात घेता, निवासी डॉक्टरांच्या मानसिक आरोग्याची दर सहा महिन्यांनी तपासणी करण्यात यावी, अशी मागणी करणारे पत्र मार्ड संघटनेने महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाला (एमयूएचएस) लिहिले आहे. मारहाणीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे निवासी डॉक्टरांच्या मनात असुरक्षितता निर्माण झाली आहे. त्यातच त्यांचे कामाचे तास खूप असल्यामुळे त्यांच्यावरचा ताण अधिकच वाढतो. त्यामुळे काही डॉक्टर हे व्यसनांच्या आहारी गेले असल्याचे मार्डचे अध्यक्ष डॉ. सागर मुंदडा यांनी सांगितले. (प्रतिनिधी)