निवासी डॉक्टरांचे वेतन वाढणार
By Admin | Published: June 13, 2015 03:18 AM2015-06-13T03:18:30+5:302015-06-13T03:18:30+5:30
वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याशी चर्चा केल्यानंतर आता निवासी डॉक्टरांचे वेतन जुलै २०१५ पासून ६ ते ७ हजार रुपये वाढवण्यात येणार
मुंबई : वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याशी चर्चा केल्यानंतर आता निवासी डॉक्टरांचे वेतन जुलै २०१५ पासून ६ ते ७ हजार रुपये वाढवण्यात येणार आहे. निवासी डॉक्टरांना पायाभूत आणि इतर सुविधा देण्यात येणार आहेत. निवासी डॉक्टरला टीबी झाल्यास आणि निवासी महिला डॉक्टर गर्भवती असल्यास त्यांना दोन महिन्यांची रजा देण्यावर चर्चा करण्यात येणार आहे. ओबीसी, एससी, एसटी फ्रीशीपवर नंतर चर्चा करण्यात येणार आहे, असे मार्डचे डॉ. अमित लोमटे यांनी सांगितले.
सोमवारपासून शांततापूर्ण स्वरूपात नागपूर मार्डने आंदोलन सुरू केले होते. यानंतर वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी मार्ड संघटनेची भेट घेतली. या चचेर्नंतर मार्डच्या त्याचप्रमाणे रुग्णालयातील सुरक्षेत वाढ करण्यात येणार आहे. सुरक्षेचे आॅडिट करण्यात येणार असून सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. (प्रतिनिधी)