कॅम्पा कोलाच्या रहिवाशांना सुप्रीम कोर्टाकडून दिलासा नाहीच

By admin | Published: May 5, 2014 01:09 PM2014-05-05T13:09:21+5:302014-05-05T13:51:12+5:30

मुंबईतील कॅम्पा कोला या इमारतीच्या रहिवाशांना सुप्रीम कोर्टाने धक्का दिला असून घर खाली करण्यासाठी मूदतवाढ देण्यास सुप्रीम कोर्टाने सोमवारी स्पष्ट नकार दिला आहे.

The residents of Campa Cola are not happy with the Supreme Court | कॅम्पा कोलाच्या रहिवाशांना सुप्रीम कोर्टाकडून दिलासा नाहीच

कॅम्पा कोलाच्या रहिवाशांना सुप्रीम कोर्टाकडून दिलासा नाहीच

Next


ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. ५ - मुंबईतील कॅम्पा कोला या इमारतीच्या रहिवाशांना सुप्रीम कोर्टाने धक्का दिला असून घर खाली करण्यासाठी मूदतवाढ देण्यास सुप्रीम कोर्टाने सोमवारी स्पष्ट नकार दिला आहे. आता ३१ मेनंतर या इमारतीवर कारवाई करण्याचा महापालिकेचा मार्ग मोकळा झाला असून यामुळे शेकडो रहिवाशांवर बेघर होण्याची नामूष्की ओढावणार आहे.
मुंबईतील वरळी येथे कॅम्पा कोला ही इमारत असून या इमारतीतील काही मजले बेकायदेशीररित्या बांधण्यात आले होते. काही महिन्यांपूर्वी या अनधिकृत मजल्यांवर महापालिकेतर्फे हातोडा मारण्यात येणार होता. मात्र या प्रकरणाची दखल घेत सुप्रीम कोर्टाने बांधकाम पाडण्यास ३१ मेपर्यँत स्थगिती दिली होती.
सोमवारी या प्रकरणावर सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. रहिवाशांनी घर खाली करण्यास ३१ मेनंतर मूदतवाढ द्यावी अशी मागणी कोर्टाकडे केली. सुप्रीम कोर्टाने मुदतवाढ देण्यास नकार देत कोर्टाची उन्हाळी सुट्टी संपल्यावर पुढील सुनावणी होईल असे स्पष्ट केले.
Update ---

Web Title: The residents of Campa Cola are not happy with the Supreme Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.