शौचालयांसाठी रहिवाशांचे आंदोलन

By admin | Published: April 27, 2016 03:01 AM2016-04-27T03:01:49+5:302016-04-27T03:01:49+5:30

माटुंग्यातील रहिवाशांना मात्र शौचालयासाठी आंदोलन करण्याची वेळ आली आहे.

Residents of the toilets | शौचालयांसाठी रहिवाशांचे आंदोलन

शौचालयांसाठी रहिवाशांचे आंदोलन

Next

मुंबई : देशात स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात झालेली असताना माटुंग्यातील रहिवाशांना मात्र शौचालयासाठी आंदोलन करण्याची वेळ आली आहे. अनेक वर्षे शौचालयाची दुरवस्था असताना पालिका आणि स्थानिक नगरसेवक या समस्येकडे कानाडोळा करत असल्याने रहिवाशांनी हे आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.
माटुंगा लेबर कॅम्प परिसरातील वाल्मीकी नगरात दीड हजार लोकवस्ती आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात लोकवस्ती असलेल्या परिसरात केवळ एकच सार्वजनिक शौचालय आहे. त्यातच पालिकेने कित्येक वर्षे या शौचालयाची डागडुजी न केल्याने सध्या या शौचालयाची मोठी दुरवस्था आहे. डागडुजीअभावी शौचालय कोसळण्याच्या अवस्थेत आहे. तर शौचालयाची ड्रेनेज लाइन पूर्णपणे तुटलेल्या अवस्थेत असल्याने संपूर्ण सांडपाणी परिसरात वाहत असते. तसेच शौचालयाचे दरवाजे आणि खिडक्यादेखील पूर्णपणे तुटलेल्या अवस्थेत आहेत. शिवाय या ठिकाणी लाइटचीदेखील सोय नसल्याने रहिवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून येथील रहिवासी या समस्येला सामोरे जात आहेत. त्यामुळे त्यांनी अनेकदा पालिका आणि येथील स्थानिक नगरसेवकांकडे अनेकदा तक्रारी दाखल केल्या आहेत. मात्र त्यांचेही दुर्लक्ष होत असल्याने रहिवाशांनी पालिका आणि स्थानिक नगरसेवकांविरुद्ध आंदोलन छेडले आहे. सोमवारी या रहिवाशांनी रस्त्यावर उतरून पालिका आणि नगरसेवकाचा निषेध व्यक्त केला. तसेच ज्या अधिकाऱ्यांनी या समस्येकडे दुर्लक्ष केले त्यांच्यावर पालिकेने तत्काळ कारवाई करावी आणि ही समस्या लवकरच सोडवावी, अशी मागणी रहिवाशांकडून करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Residents of the toilets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.