'राजीनामा द्या, अन्यथा तुमचा बाबा सिद्दिकी करू', योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2024 01:44 PM2024-11-03T13:44:06+5:302024-11-03T13:45:44+5:30
मुंबई पोलिसांनी धमकी देणाऱ्या फातिमा खान नावाच्या महिलेला ताब्यात घेतले आहे.
Yogi Adityanath : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. 'दहा दिवसांत मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्या, अन्यथा तुम्हाला बाबा सिद्दिकीप्रमाणे मारुन टाकू' असा धमकीचा मेसेज मुंबई पोलीस कंट्रोल रुमला पाठवण्यात आला. यानंतर पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवले अन् धमकी देणाऱ्या महिलेला पोलीस आणि एटीएसने ताब्यात घेतले.
ही महिला सुशिक्षित असून, मानसिकदृष्ट्या कमकुवत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. आरोपी महिलेने मुंबई पोलीस नियंत्रण कक्षात मेसेज केला होता की, योगी आदित्यनथ यांनी 10 दिवसांत राजीनामा दिला नाही, तर आम्ही त्यांना बाबा सिद्दीकीप्रमाणे मारून टाकू. धमकीचा संदेश मिळाल्यानंतर महाराष्ट्र एटीएस, ठाणे पोलिस आणि मुंबईचे वरळी पोलिस तपासात गुंतले. संयुक्त तपासात ही महिला उल्हासनगर, ठाणे येथील रहिवासी असल्याचे समोर आले आहे. फातिमा खान असे तिचे नाव आहे.
Mumbai Traffic PCR receive death threat against UP CM Yogi Adityanath
— ANI Digital (@ani_digital) November 3, 2024
Read @ANI Story | https://t.co/hW4dtfVMcz#CMYogi#Mumbaipic.twitter.com/OCsPt1lVnx
एटीएसने पोलिसांसह सुरुवातीला महिलेच्या घरी पोहोचून तिची चौकशी केली. यानंतर तिला स्थानिक पोलीस ठाण्यात आणून तिथेही चौकशी करण्यात आली. त्यानंतर वरळी पोलीस तिला घेऊन मुंबईत आले, मात्र महिलेला अद्याप अटक झाली नाही, असे मुंबईच्या वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याने सांगितले आहे. महिलेची मानसिक स्थिती तपासण्यासाठी मानसिक तपासणीही केली जाणार आहे.
योगींचा महाराष्ट्र दौरा
दरम्यान महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ योगी आदित्यनाथ महाराष्ट्रात येत आहेत. त्यांच्या राज्यभर 15 सभा होणार असून, याबाबत महाराष्ट्र पोलीस सतर्क आहेत. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेबाबत कोणतीही कसर सोडली जाणार नाही, असे उत्तर प्रदेशचे डीजीपी प्रशांत कुमार यांनी म्हटले आहे.