सुरक्षेवरील आक्षेपानंतर राजीनामा

By admin | Published: June 12, 2015 04:05 AM2015-06-12T04:05:03+5:302015-06-12T04:05:03+5:30

सरसंघचालक मोहन भागवत यांच्या झेड प्लस सुरक्षेवर आक्षेप घेणारे भाजपचे नेते कैलाशनाथ भट यांनी बुधवारी राज्य प्रवक्तेपदाचा राजीनामा दिला

Resignation after security offense | सुरक्षेवरील आक्षेपानंतर राजीनामा

सुरक्षेवरील आक्षेपानंतर राजीनामा

Next

जयपूर : सरसंघचालक मोहन भागवत यांच्या झेड प्लस सुरक्षेवर आक्षेप घेणारे भाजपचे नेते कैलाशनाथ भट यांनी बुधवारी राज्य प्रवक्तेपदाचा राजीनामा दिला. काही दिवसांपूर्वी भट यांनी आपल्या पोस्टवर भागवत यांच्या सुरक्षेबाबत आक्षेप नोंदविला होता. त्यानंतर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त झाल्या होत्या. माझ्या विधानावर आक्षेप घेतल्यामुळे मी राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी नमूद केले.
भागवत यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात आल्याबद्दल सोमवारी भट यांनी आश्चर्य व्यक्त केले होते. परमपूज्य सरसंघचालकांना झेड प्लस सुरक्षा का देण्यात आली, त्यांनी ती स्वीकारली का, असा सवाल त्यांनी केला होता. सध्या काही शक्ती देशाला कमकुवत आणि अस्थिर करण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे सरसंघचालकांना देण्यात आलेली सुरक्षा देशाच्या दृष्टीने हिताचीच आहे, असेही ते फेसबुकवरील पोस्टवर म्हणाले. (वृत्तसंस्था)

Web Title: Resignation after security offense

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.