अहेरावर नियंत्रण आणण्याचा संकल्प!
By admin | Published: May 2, 2017 04:17 AM2017-05-02T04:17:41+5:302017-05-02T04:17:41+5:30
लग्नाचा बस्ता व अहेर पद्धतीवर नियंत्रण आणण्याचा निर्णय घेऊन हाटकर समाजाने क्रांतिकारक पाऊल उचलले आहे
धुळे : लग्नाचा बस्ता व अहेर पद्धतीवर नियंत्रण आणण्याचा निर्णय घेऊन हाटकर समाजाने क्रांतिकारक पाऊल उचलले आहे. या निर्णयाची अंमलबजावणी तालुक्यातील निकुंभे ग्रामस्थांनी केल्यामुळे त्यांचा नुकताच हाटकर समाज सामुदायिक विवाह सोहळा समितीतर्फे सत्कार करण्यात आला.
गतवर्षी समितीतर्फे हाटकर समाजातील खर्चीक बस्ता पद्धत आणि अहेर यावर नियंत्रण ठेवण्याचे आवाहन करण्यात आले होते. दोन्ही बाजूने दोन महिला व दोन पुरुष यांनी बस्त्याला जाण्याचा निर्णय १९ एप्रिलला निकुंभे ग्रामस्थांनी बैठकीत घेतला होता. त्यानंतर २१ एप्रिलला हाट्टी येथील सामुदायिक विवाह सोहळ्यात समाजाचे नेते व सभापती मधुकर गर्दे यांनी ठराव मांडला. त्यास सर्व समाजाने संमती देत मंजुरी दिली होती.
लग्न बस्ता व अहेराबाबतच्या निर्णयाची अंमलबजावणी निकुंभे येथील भाया आत्माराम पाटील यांनी करून दाखविली. (प्रतिनिधी)
हाटकर समाज अनिष्ठ प्रथांना फाटा देणार
साक्री तालुक्यातील कुडाशी येथे आदिवासी कोकणी समाजाच्या मेळाव्यात विवाहावर मोठा खर्च करू नये, शिक्षणाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी प्रयत्नशील राहावे, समाजबांधवांनी अंधश्रद्धेवर विश्वास ठेवू नये, आरोग्य बिघडल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, तरुणांनी व्यसनांपासून दूर राहावे, असे महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.