प्रयोगशील शेतकऱ्यांची रिसोर्स बँक लवकरच- दादा भुसे
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2020 04:46 AM2020-06-18T04:46:55+5:302020-06-18T04:47:13+5:30
‘आधुनिक शेती : महाराष्ट्राचे भविष्य’ वेबिनारमध्ये दिली माहिती
नाशिक : प्रगत व लाभदायी शेतीविषयक मार्गदर्शनासाठी तीन हजार प्रयोगशील शेतकऱ्यांची रिसोर्स बँक तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात असून, महिनाभरात हे काम पूर्ण होईल, अशी माहिती राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी लोकमत आयोजित वेबिनारमध्ये दिली.
लोकमत अॅग्रोत्सव अंतर्गत बसंत अॅग्रो टेक (इं) लि. आणि सिएट स्पेशॅलिटी टायर्स यांच्या सहकार्याने ‘आधुनिक शेती : महाराष्टÑाचे भविष्य’ या विषयावर संपन्न झालेल्या वेबिनारमध्ये भुसे बोलत होते. या वेबिनारमध्ये राज्याचे कृषी आयुक्त सुहास दिवसे, महाराष्टÑ शेतकरी संघटनेचे संस्थापक विजय जावंधिया, सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे, रुरल रिलेशन्सचे संस्थापक प्रदीप लोखंडे, भारतीय बीज उद्योग महासंघाचे कार्यकारी संचालक डॉ. शिवेंद्र बजाज यांच्यासह प्रायोजक कंपन्यांचे मान्यवर सहभागी झाले होते. विजय जावंधिया म्हणाले, शेतीमध्ये तंत्रज्ञानाचा वापर करण्यास विरोध नाही; पण तंत्रज्ञानाचा वापर करून वाढविलेल्या उत्पादनाला दर मिळेल का, हा खरा प्रश्न आहे. शेतकºयांना आपल्या मालाचे मार्केटिंग करता आले पाहिजे. केवळ रडगाणं गाऊन शेतकºयांचे प्रश्न सुटत नाही, असे मत प्रदीप लोखंडे यांनी व्यक्त केले. विलास श्ािंदे यांनी, गावातून शहरात गेलेले टॅलेंट, भांडवल हे परत शेतीत कसे येईल याबाबत धोरण आखले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. डॉ. शिवेंद्र बजाज यांनी विविध पिकांच्या बियाणे व घ्यावयाच्या काळजीबाबत माहिती यावेळी दिली. या वेबिनारला बसंत अॅग्रो टेकचे अध्यक्ष अक्षय भरतीया तसेच द्राक्ष, पेरू, डाळिंब, केळी, कापूस, स्ट्रॉबेरी व संत्रा उत्पादक संघटनांचे सहकार्य लाभले.