भाजपाच्या भावनिक आवाहनाला प्रतिसाद

By admin | Published: October 20, 2014 05:04 AM2014-10-20T05:04:24+5:302014-10-20T05:04:24+5:30

मोदी लाटेपेक्षा एकनाथ खडसे यांच्या रूपाने प्रथमच खान्देशचा मुख्यमंत्री व्हावा, या आवाहनाला मतदारांनी प्रतिसाद दिला. प्रथमच दोन आकडी संख्या भाजपाने गाठली.

Responding to BJP's emotional appeal | भाजपाच्या भावनिक आवाहनाला प्रतिसाद

भाजपाच्या भावनिक आवाहनाला प्रतिसाद

Next

मिलिंद कुळकर्णी
मोदी लाटेपेक्षा एकनाथ खडसे यांच्या रूपाने प्रथमच खान्देशचा मुख्यमंत्री व्हावा, या आवाहनाला मतदारांनी प्रतिसाद दिला. प्रथमच दोन आकडी संख्या भाजपाने गाठली. ३४ वर्षे म्हणजे सलग नऊ वेळा आमदार राहिलेल्या सुरेशदादा जैन (शिवसेना) यांचा पराभव धक्कादायक ठरला.
जळगाव जिल्ह्यातील तब्बल ८ आमदारांना मतदारांनी घरी पाठवले. युती तुटण्याला कारणीभूत ठरल्याची चर्चा असलेली भुसावळची जागा भाजपाने सेनेकडून खेचून घेतली. उद्धव ठाकरे यांनी मुक्ताईनगरात सभा घेऊनही खडसे निवडून आले, पण मताधिक्य ९,७०८ वर आले. राष्ट्रवादीला मोठा फटका बसला. केवळ एक उमेदवार निवडून आला. धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात गावित बंधूंची सद्दी मतदारांनी संपवली. स्वत: डॉ.विजयकुमार गावित निवडून आले तरी शरद व राजेंद्र हे बंधू आणि जगदीश हे शालक पराभूत झाले. आदिवासी बांधवांनी पुन्हा काँग्रेसवर विश्वास व्यक्त केला. इगतपुरीसह तब्बल ६ आदिवासी जागा काँग्रेसने जिंकल्या. शिवसेनेची स्थिती जैसे थे राहिली. धुळ्यातली जागा गमावली, तरी जळगावात ती कमावली. मनसेला हद्दपार करतानाच, माकपाचे पुनरुज्जीवन करून, भाजपाला थोडे झुकते माप देऊन आणि उभय काँग्रेसच्या पदरात त्यांचे माप टाकून नाशिक जिल्ह्यातील मतदारांनी मोठा विलक्षण समन्वय साधला आहे. राज ठाकरे यांनी ज्या शहराला आपली राजकीय प्रयोगशाळा मानले, त्या नाशिक शहराने त्यांच्या पक्षाकडील तिन्ही आमदारक्या खेचून घेतल्या व त्या अलगदपणे भाजपाच्या ओंजळीत टाकल्या.

Web Title: Responding to BJP's emotional appeal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.