महाड दुर्घटनेची जबाबदारी सरकार म्हणून आमचीच - नितीन गडकरी

By admin | Published: August 6, 2016 01:48 PM2016-08-06T13:48:32+5:302016-08-06T14:02:18+5:30

महाड सावित्री नदी पूल दुर्घटनेनंतर आरोप - प्रत्यारोप होत असताना केंद्रीय रस्ते आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी महाड दुर्घटनेची जबाबदारी सरकार म्हणून आमचीच असल्याचं म्हटलं आहे

The responsibility of Mahad's accident is ours as the government - Nitin Gadkari | महाड दुर्घटनेची जबाबदारी सरकार म्हणून आमचीच - नितीन गडकरी

महाड दुर्घटनेची जबाबदारी सरकार म्हणून आमचीच - नितीन गडकरी

Next
>ऑनलाइन लोकमत - 
नवी मुंबई, दि. 6 - महाड सावित्री नदी पूल दुर्घटनेनंतर आरोप - प्रत्यारोप होत असताना केंद्रीय रस्ते आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी महाड दुर्घटनेची जबाबदारी सरकार म्हणून आमचीच असल्याचं म्हटलं आहे. तसंच 180 दिवसात त्या ठिकाणी नवा पूल बांधणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. मुंबई - गोवा मार्गाच्या 4 लेनचे काम डिसेंबरपर्यंत सुरु करणार असून येत्या 2 वर्षात हा मार्ग पुर्ण करणार असल्याचं नितीन गडकरी बोलले आहेत.
 
महाड पूल दुर्घटनेचे जोरदार पडसाद बुधवारी विधानसभेमध्ये उमटले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी या दुर्घटनेसाठी राज्य सरकारला जबाबदार ठरवत याप्रकरणी चंद्रकांत पाटील यांच्यावर हत्येचा (३०२) गुन्हा दाखल करा, अशी मागणी केली होती. 
 
(चंद्रकांत पाटील यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करा - अजित पवार)
 
या दुर्घटनेला सरकारचा बेजबाबदरपणा कारणीभूत असून, नवीन पुलावरुन वाहतूक सुरु असताना जुन्या पुलावरुन वाहतूक बंद का केली नाही ? असा सवाल अजित पवार यांनी विचारला होता. तसेच या घटनेची न्यायायलयीन चौकशी करून कठोर कारवाई करा अशीही मागणी केली होती. 
 

Web Title: The responsibility of Mahad's accident is ours as the government - Nitin Gadkari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.