आरामबसने सात बैलगाड्यांना उडविले
By admin | Published: March 18, 2016 02:27 AM2016-03-18T02:27:31+5:302016-03-18T02:27:31+5:30
कर्मवीर शंकरराव काळे कारखान्यासाठी ऊस वाहतूक करणाऱ्या बैलगाड्यांना आरामबसने धडक दिली. गुरूवारी पहाटे जेऊर कुंभारी फाट्यावर घडलेल्या या घटनेत एक बैल
कोपरगाव (जि. अहमदनगर) : कर्मवीर शंकरराव काळे कारखान्यासाठी ऊस वाहतूक करणाऱ्या बैलगाड्यांना आरामबसने धडक दिली. गुरूवारी पहाटे जेऊर कुंभारी फाट्यावर घडलेल्या या घटनेत एक बैल जागीच ठार झाला़ तर १९ ऊस तोडणी कामगारांसह दहा बैल जखमी झाले़
कर्मवीर शंकरराव काळे साखर कारखान्यासाठी ऊस घेऊन येण्यासाठी सात बैलगाड्या झगडे फाट्यामार्गे कोकमठाणकडे निघाल्या़ गुरूवारी पहाटे साडेचारच्या सुमारास या गाड्या जेऊर-कुंभारी शिवारात असताना नाशिकहून कोपरगावकडे येणाऱ्या साई सुप्रिम कंपनीच्या लक्झरी बसने (क्रमांक एमएच ०४ जी ८९४९) जोरदार धडक दिली़ या धडकेमुळे सातही बैलगाड्या एकमेकांवर आदळल्या़ यात एक बैल जागीच ठार झाला़ तर उर्वरित दहा बैल जखमी झाले़ १० ऊस तोडणी कामगार जखमी झाले़ पैकी शामराव चव्हाण, ताईबाई चव्हाण, प्रकाश चव्हाण हे तिघे गंभीर जखमी झाले त्यांना शिर्डी येथील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे़ उर्वरित जखमींमध्ये ललिता चव्हाण, धनराज राठोड, संगीता राठोड, रवींद्र राठोड, भाईदास पवार, वैजयंती पवार, रेखाबाई पवार, श्रावण पवार, लंकाबाई पवार, मोतीलाल चव्हाण,सुभाष चव्हाण, सुमनबाई चव्हाण, पिंटू सोनवणे, प्रियंका सोनवणे (सर्व रा़ नागततांडा, चाळीसगाव) यांचा समावेश आहे़ बस चालकाविरूद्ध मुकदम राजू शंकर जाधव यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला
आहे़ (प्रतिनिधी)