31 मेपर्यंत निर्बंध कायम; मंत्रिमंडळाचे शिक्कामोर्तब; १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण थांबविले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2021 06:06 AM2021-05-13T06:06:06+5:302021-05-13T06:10:02+5:30

पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटचे प्रमुख अदर पूनावाला यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुंबईत येऊन भेट घेतली. मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्वतः ही माहिती मंत्रिमंडळ बैठकीत दिली.

Restrictions remain in place until May 31; Vaccination between the ages of 18 to 44 has been stopped by the Cabinet | 31 मेपर्यंत निर्बंध कायम; मंत्रिमंडळाचे शिक्कामोर्तब; १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण थांबविले

31 मेपर्यंत निर्बंध कायम; मंत्रिमंडळाचे शिक्कामोर्तब; १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण थांबविले

Next

अतुल कुलकर्णी -
 
मुंबई : राज्यभरात वाढत असलेला कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन राज्य सरकारने १५ मेपर्यंत लागू केलेल्या कडक निर्बंधांची मुदत आता ३१  मेपर्यंत वाढविण्यात आली आहे. याशिवाय १८ ते ४४ वयोगटांतील नागरिकांचे लसीकरण थांबविण्यात आले आहे. बुधवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या दोन्ही निर्णयांवर शिक्कामोर्तब झाले. ‘लोकमत’ने या दोन्ही बातम्या या अगोदरच प्रकाशित केल्या होत्या. (Restrictions remain in place until May 31; Vaccination between the ages of 18 to 44 has been stopped by the Cabinet)

पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटचे प्रमुख अदर पूनावाला यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुंबईत येऊन भेट घेतली. मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्वतः ही माहिती मंत्रिमंडळ बैठकीत दिली. पूनावाला दर महिन्याला दीड कोटी लसींचा डोस देण्यासाठी तयार आहेत. २० मेपासून ते लस देणे सुरू करतील, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. पूनावाला आणि मुख्यमंत्री ठाकरे यांची चर्चा झाली. त्याची फारशी वाच्यता होऊ नये, असा पूनावाला यांचाही आग्रह होता, असे सूत्रांनी सांगितले. ते डोस आल्यानंतर लसीकरण मोहीम वेग घेईल. त्या दृष्टीने प्रशासन नियोजन करत असल्याची माहिती मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आली. 

त्यासोबतच कोव्हॅक्सिनचे डोस मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्राला देऊ, असे भारत बायोटेकच्या संचालकांनी सांगितल्याचे वृत्त आहे. त्यामुळेच १८ ते ४४ वयोगटांतील लसीकरण थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  राज्यात १ कोटी ८८ लाख लोकांना लस देण्यात आली आहे. मात्र, त्यातील फक्त ३६ लाख ५४ हजार लोकांना दोन्ही डोस मिळाले आहेत. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत २० तारखेपर्यंत राज्यात शिल्लक असलेल्या १० लाख डोसमधून दुसरा डोस न मिळालेल्या लोकांचे लसीकरण प्राधान्याने केले जाईल, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. 
प्रत्येक जिल्ह्यात ऑक्सिजन प्लाटच्या सूचना  
येत्या १५ दिवसांत प्रत्येक जिल्ह्यात ऑक्सिजन प्लांट उभे करण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त व पालकमंत्री यांनी लक्ष केंद्रित करावे. विभागीय आयुक्तांनी ऑक्सिजन प्लांटच्या कामाचा आढावा घ्यावा. जी कामे गतीने करण्याची आवश्यकता आहे, ती पूर्ण करावीत, अशा सूचना सर्व अधिकाऱ्यांना द्या, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी बैठकीत सांगितले.

मुख्यमंत्री ठाकरे यांच्याशी  अदर पूनावाला यांची चर्चा
   चर्चेने निर्णयाची मुभा
-  महाराष्ट्रात १५ मेपर्यंत कठोर निर्बंध लागू केले आहेत. आणखी १५ दिवस हे निर्बंध लागू करत असताना, त्यातील ६ ते ७ दिवस वेगवेगळ्या सुट्ट्या आहेत. त्यामुळे सरकारच्या कामकाजावर फारसा परिणाम होणार नाही, असाही सूर बैठकीत उमटला. 
-  काही जिल्ह्यांनी लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्यावरही मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली. ज्या जिल्हा प्रशासनाला आपल्या जिल्ह्यात कठोर निर्बंध लागू करावेत, असे वाटत असेल, त्यांना त्यासाठी परवानगी देण्यात येत असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. 
-  जिल्हाधिकारी आणि पालकमंत्री यांनी आपापसात चर्चा करून 
तसे निर्णय घ्यावेत, अशा सूचना राज्यात देण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. 

देशात कोरोनामुळे -
४,२०५ - जणांचा मृत्यू
३,४८,४२१ - नवे रुग्ण
२,३३,४०,९३८ - देशात एकूण रुग्ण
३७,०४,०९९ - उपचाराधीन 
९३,८२,६४२ - बरे झाले 

नवी दिल्ली - देशात बुधवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासांत कोरोनामुळे ४,२०५ जणांचा मृत्यू झाला, तर ३,४८,४२१ नव्या रुग्णांची नोंद झाली. एकूण मृत्यूसंख्या २,५४,१९७ झाली, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने निवेदनाद्वारे म्हटले. 

आयसीएमआरकडील माहिती... - ११ मेपर्यंत ३०,७५,८३,९९१ नमुने तपासले गेले असून, मंगळवारी १९,८३,८०४ नमुन्यांची तपासणी केली.
 

Web Title: Restrictions remain in place until May 31; Vaccination between the ages of 18 to 44 has been stopped by the Cabinet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.