दहावीच्या निकालाचा यंदा टक्का घसरला, मागील पाच वर्षातील सर्वात कमी निकाल 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2019 12:05 PM2019-06-08T12:05:07+5:302019-06-08T12:09:06+5:30

पालक आणि विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली...

The result of 10th class results decreased this year, lowest result in the last five years | दहावीच्या निकालाचा यंदा टक्का घसरला, मागील पाच वर्षातील सर्वात कमी निकाल 

दहावीच्या निकालाचा यंदा टक्का घसरला, मागील पाच वर्षातील सर्वात कमी निकाल 

googlenewsNext
ठळक मुद्दे राज्याचा निकाल हा ७७.१० टक्के

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला. राज्याचा निकाल हा ७७.१० टक्के लागला. यंदा हा निकाल तब्बल १२ टक्क्यांनी घसरला आहे.त्यामुळे निश्चितच विद्यार्थ्यांचे दडपण वाढले आहे. शनिवारी (दि. ८) सकाळी पत्रकार परिषदेत राज्य शिक्षण महामंडळाच्या अध्यक्ष डॉ. शकुंतला काळे यांनी हा निकाल जाहीर केला. मंडळाने दिलेल्या अधिकृत संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना दुपारी १ वाजता आपला निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे. या संकेतस्थळावरून विषयनिहाय गुणांची प्रतही घेता येणार आहे.  
इयत्ता बारावीचा निकाल दि. २८ मे रोजी जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी व पालकांना दहावीच्या निकालाची प्रतीक्षा होती. परंतु, शनिवारी सकाळी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून जाहीर करण्यात आलेल्या निकालात राज्याचा निकाल १२.टक्क्यांनी घसरल्याचे समोर आले. त्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली आहे. मागील पाच वषार्तील यंदाचा निकाल हा सर्वात कमी आहे. या परीक्षेला १७ लाख ८१३ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. यामध्ये ९ लाख २७ हजार ८२२ विद्यार्थी तर ७ लाख ७२ हजार ८४२ विद्यार्थिनींचा समावेश होता. परीक्षेस बसलेल्यांपैकी एकूण उत्तीर्ण - १२४७९०३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. 

काही दिवसांपासून सोशल मीडियावरून निकालाच्या तारखांचा संदेश व्हायरल होत होता. त्यामुळे संभ्रम निर्माण झाला होता. मंडळाकडूनही अशा अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले होते. अखेर मंडळाने शुक्रवारी निकालाची तारीख जाहीर केली. या परीक्षेला १७ लाख ८१३ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. यामध्ये ९ लाख २७ हजार ८२२ विद्यार्थी तर ७ लाख ७२ हजार ८४२ विद्यार्थिनींचा समावेश होता.  विद्यार्थ्यांना दुपारी एक वाजल्यानंतर मंडळाने दिलेल्या तीन संकेतस्थळावर निकाल पाहता येणार आहे. आॅनलाईन निकालाबरोबरच विद्यार्थ्यांना एसएमएसद्वारेही निकाल समजू शकेल. राज्यभरातून २२ हजार २२४ शाळांमधून १७ लाख ८१३ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. 

विद्यार्थ्यांना 1 वाजता ऑनलाइन पाहता येणार निकाल..

* असा पाहा SSC निकाल 
www.mahresult.nic.in 
www.sscresult.mkcl.org 
www.maharashtraeducation.com
www.mahresult.nic.in 

Web Title: The result of 10th class results decreased this year, lowest result in the last five years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.