दहावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल बुधवारी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2018 06:34 PM2018-08-28T18:34:35+5:302018-08-28T18:37:16+5:30

दहावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल बुधवारी अाॅनलाईन जाहीर करण्यात येणार अाहे.

Result of the Class10 Supplementary Examination on Wednesday | दहावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल बुधवारी

दहावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल बुधवारी

Next

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल बुधवारी (दि. २९) दुपारी एक वाजता आॅनलाईन जाहीर केला जाणार आहे. मंडळाच्या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण उपलब्ध होतील, अशी माहिती मंडळाचे प्रभारी सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिली.

     मंडळमार्फत दि. १७ जुलै ते २ आॅगस्ट या कालावधी इयत्ता दहावीची परीक्षा घेण्यात आली. काही दिवसांपुर्वीच इयत्ता बारावीचा निकाल लागल्याने दहावीच्या निकालाबाबत विद्यार्थ्यांना उत्सुकता होती. मंडळाच्या संकेतस्थळावर बुधवारी दुपारी एक वाजता हा निकाल जाहीर केला जाणार आहे. संकेतस्थळावर उपलब्ध विषयनिहाय गुणांच्या माहितीची प्रत विद्यार्थ्यांना घेता येईल. गुणांची पडताळणी करण्यासाठी विद्यार्थ्यांना दि. ३० आॅगस्ट ते ८ सप्टेबर या कालावधीत विभागीय मंडळाकडे अर्ज करावा लागेल. तर उत्तरपत्रिकांच्या छायाप्रतीसाठी अर्ज करण्याची मुदत दि. १८ सप्टेंबरपर्यंत देण्यात आली आहे. दोन्ही अर्जांसोबत आॅनलाईन निकालाची प्रत जोडणे आवश्यक आहे. अर्जाचा नमुना मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

    उत्तरपत्रिककांचे पुनर्मुल्यांकन करण्यासाठी उत्तरपत्रिकेची छायाप्रत घ्यावी लागेल. छायाप्रत मिळाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून पाच दिवसांत पुनर्मुल्यांकनासाठी विभागीय मंडळाकडे अर्ज करणे गरजेचे आहे. या परीक्षेत सर्व विषय घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांची संपादणूक सुधारण्यासाठी श्रेणीसुधार योजनेअंतर्गत मार्च २०१९ मध्ये होणारी परीक्षा देता येईल. मार्च २०१९ मध्ये होणारी परीक्षा देऊ इच्छिणारे पुनर्परीक्षार्थी विद्यार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी तसेच श्रेणीसुधार योजनेअंतर्गत बसणारे व अन्य विद्यार्थ्यांचे अर्ज आॅनलाईन पध्दतीने स्वीकारले जाणार आहेत, अशी माहिती भोसले यांनी दिली.
-----------
निकालासाठी संकेतस्थळ - www.mahresult.nic.in

Web Title: Result of the Class10 Supplementary Examination on Wednesday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.