मुंबईतील टॅक्सी-वेच्या बांधकामामुळे नागपुरातील उड्डाणावर परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2016 08:06 PM2016-10-05T20:06:52+5:302016-10-05T20:06:52+5:30
मुंबई विमानतळावर टॅक्सी-वेच्या निर्माण कार्यामुळे काही महिने विमानांच्या उड्डाणावर परिणाम होणार आहे. दररोज आठ तासांच्या निर्माण कार्यादरम्यान एक धावपट्टी बंद
Next
id="yui_3_16_0_ym19_1_1475675446105_10152">ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 05 - मुंबई विमानतळावर टॅक्सी-वेच्या निर्माण कार्यामुळे काही महिने विमानांच्या उड्डाणावर परिणाम होणार आहे. दररोज आठ तासांच्या निर्माण कार्यादरम्यान एक धावपट्टी बंद राहणार आहे. त्याचा परिणाम डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील विमान सेवेवर होण्याची शक्यता आहे.
मुंबई विमानतळावर धावपट्टीची क्षमता वाढविण्यासाठी दोन टॅक्सी-वे तयार करण्यात येत आहे. मुंबई विमानतळावरून संचालित होणा-या उड्डाणांमध्ये ५०० पेक्षा जास्त घरगुती उड्डाणे आहेत. विदेशी उड्डाणांच्या तुलनेत ही संख्या दुप्पट आहे. त्यामुळे घरगुती उड्डाणांवर टॅक्सी-वेच्या निर्माण कार्याचा परिणाम होणार आहे. त्यामुळे नागपूर-मुंबई यादरम्यानची विमान सेवा प्रभावित होऊन वेळेत बदल होऊ शकतो. त्याला नागपूर विमानतळावरील अधिका-यांनी दुजोरा दिलेला नाही. जर सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यंत निर्माण कार्यासाठी धावपट्टी बंद राहिली तर नागपूर ते मुंबईदरम्यान सकाळची सर्व विमाने उड्डाण भरणार नाहीत. तसे पाहता एअर इंडियाचे सकाळी ६ वाजता रवाना होणाºया विमानाच्या उड्डाण वेळेत आंशिकरीत्या बदल करण्यात आला आहे. नागपुरातून सायंकाळी मुंबईला पोहोचणाºया दोन विमानांव्यतिरिक्त अन्य दोन विमानांच्या उड्डाणात बदल होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली.