म्हाडा परीक्षेचा प्रलंबित निकाल जाहीर
By Admin | Published: November 6, 2015 02:23 AM2015-11-06T02:23:37+5:302015-11-06T02:23:37+5:30
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणातर्फे (म्हाडा) १ नोव्हेंबर रोजी घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल गुरुवारी संकेतस्थळावर जाहीर केला असून दिवाळीनंतर
मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणातर्फे (म्हाडा) १ नोव्हेंबर रोजी घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल गुरुवारी संकेतस्थळावर जाहीर केला असून दिवाळीनंतर उमेदवारांच्या कागदपत्रांची छाननी करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.
कागदपत्रांची छाननी झाल्यानंतर उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात येईल. मागासवर्गीय प्रवर्गात कमी जागा असल्याने अनेक मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी खुल्या प्रवर्गासाठीही अर्ज केला आहे. त्यांनी खुल्या प्रवर्गाचेही परीक्षा शुल्क भरले आहे. निकालामध्ये अनेक मागासवर्गीय विद्यार्थी मेरिटमध्ये आल्याने त्यांच्या कागदपत्रांची आणि शुल्काबाबत तपासणी करून त्यांना नियुक्तीपत्र देण्यात येईल, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.