हेअर बँड नाही लावला म्हणून विद्यार्थिनीला १२० उठा बशाची शिक्षा

By admin | Published: September 9, 2016 04:54 PM2016-09-09T16:54:35+5:302016-09-09T16:54:35+5:30

शाळेत आल्यानंतर हेअर बँड न लावल्याने एका विद्यार्थीनीला १२० उठा बशांची शिक्षा सुनावल्याचा प्रकार अंबरनाथमध्ये समोर आला आहे.

As a result of not imposing a hair band, | हेअर बँड नाही लावला म्हणून विद्यार्थिनीला १२० उठा बशाची शिक्षा

हेअर बँड नाही लावला म्हणून विद्यार्थिनीला १२० उठा बशाची शिक्षा

Next
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
अंबरनाथ, दि. ९ -  शाळेत आल्यानंतर हेअर बँड न लावल्याने एका विद्यार्थीनीला  १२० उठा बशांची शिक्षा सुनावल्याचा  प्रकार अंबरनाथमध्ये समोर आला आहे. मदनसिंग मनवीर सिंग या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत ६ वी इयत्त शिक्षणाऱ्या जेहान शेख या विद्यार्थिनीला शाळेतील महिला शिक्षिकेने ही शिक्षा सुनावली .
 
जेहान शाळेत येताना  हेअर बँड लावायला विसरली, मात्र हेअर बँड न लावल्याने तिच्या शिक्षिकेने तिला ६० उठा बशा काढण्याची शिक्षा दिली. जेहानने ६० उठाबशा काढल्या मात्र शिक्षिकेचे लक्ष नसल्याने शिक्षिकेने जेहानला पुन्हा ६० उठाबशा काढायला लावल्या. या सगळ्या शिक्षेच्या प्रकारामुळे  जेहानची प्रकृती बिघडली असून तिच्या पायाच्या मांसपेशी जाम झाल्याने तिला चालणं देखील मुश्कील झालं आहे. 
 
अखेर जेहानला तिच्या पालकांना अंबरनाथ पालिकेच्या छाया रुग्णालयात उपचारार्थ  दाखल करावे लागले. सध्या तिच्यावर उपचार सुरु आहेत.या सगळ्या प्रकारामुळे जेहान घाबरली असून शुल्लक गोष्टीसाठी अशा प्रकारची शिक्षा करायला नको होती,असे तिच्या आईचे म्हणणे आहे.

Web Title: As a result of not imposing a hair band,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.