गणवेश घातला नाही म्हणून विद्यार्थ्याला बेदम मारहाण, वीडियो व्हायरल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 01:35 PM2017-07-19T13:35:30+5:302017-07-19T16:29:09+5:30

श्यामकुमार पुरे / ऑनलाइन लोकमत सिल्लोड, दि. 19 - सिल्लोड येथील वरुड काजी रोडवर असलेल्या इंग्रजी माध्यमातील शाळेच्या शिक्षकाने एका ...

As a result of not wearing uniform, the student suffers from beating, video viral | गणवेश घातला नाही म्हणून विद्यार्थ्याला बेदम मारहाण, वीडियो व्हायरल

गणवेश घातला नाही म्हणून विद्यार्थ्याला बेदम मारहाण, वीडियो व्हायरल

googlenewsNext

tyle="text-align: justify;">श्यामकुमार पुरे / ऑनलाइन लोकमत
सिल्लोड, दि. 19 - सिल्लोड येथील वरुड काजी रोडवर असलेल्या इंग्रजी माध्यमातील शाळेच्या शिक्षकाने एका विद्यार्थ्याला मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. जि. ए. शहा यूनिव्हर्सल अॅकेडमी इंग्रजी शाळेत 10 दहावीच्या विद्यार्थ्यांने शाळेचा गणवेश घातला नाही म्हणून शाळेच्या प्रचार्याने त्याला वर्गातून कॉलर व केस पकडून कुत्र्या सारखे ओढ़त आणून रिसेप्शन वर बेदम मारहाण केली. या घटनेमुळे मुलगा डिप्रेशन मध्ये गेला असून त्यांच्या जिवाला धोका आहे. अशी तक्रार मुलाच्या वडिलांनी सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात दिली आहे. पोलिसांनी बालसंरक्षण अधिनियम कलम 23 नुसार त्या प्राचार्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या मारहानीचा वीडियो सर्वत्र व्हायरल झाला आहे. मारहाण झालेल्या मुलाचे नाव डेविड प्रवीणभाई वनकर पटेल रा. देवळा. ता. कुतीबाजार.जिल्हा पोरबंदर राज्य गुजरात.हल्ली मुकाम सिल्लोड असे आहे.

मुलाचे वडील प्रवीणभाई खिमजी वनकर वय 43 यांनी सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यात म्हटले आहे की,13 जुलै रोजी माझा मुलगा डेविड शाळेत गेला असता शाळा भरल्यावर वर्गात 10 ते 10.30 वाजता शाळेचे प्राचार्य राहुलदेव भगत वर्गात आले. त्यांनी सर्व मुला समोर डेविडची कॉलर, व केस पकडून जोरजोरात आरडा ओरड करुण दमदाटी करून मारहाण करीत त्याला वर्गातून ओढ़त रिसेप्शन पर्यन्त आनले.व बेदम मारहाण केली. यामुळे माझा मुलगा डिप्रेशन मध्ये गेला आहे. तो 14 तारखे पासून शाळेत गेला नाही.म्हणून मी त्याची रजा मंजूर करुण घेतली आहे. मी घटनेच्या दिवशी कुटुंबा सोबत खुलताबाद येथे दर्शनसाठी गेलो होतो. घरी आल्यावर मुलाने आई मधुबाई हिला घडलेली हकिगत सांगितली यावरून घटना उघड़कीस आली.

टीसी देण्याची धमकी देवून माफ़ी नामा घेतला...
डेविडला बेदम मारहाण करुण प्राचार्यानी उलट त्याला टीसी देवून शाळेतुन काढून टाकन्याची धमकी दिली. व बळजबरी माफ़ी नामा लिहून घेतला. या माफिनाम्यात मी शाळेत सभ्यवर्तन करेल... शिक्षकांशी चांगला वागेल गैर वर्तन करणार नाही.. एकदा मला माफ़ करा असे लिहिले आहे.

उड़वा उडविचे उत्तर दिले...

मुलाला शाळेत बेदम मारहाण का केली यांचे जाब प्राचार्याना विचारले असता त्यांनी उड़वा उडविचे उत्तर दिले...
- मधुबाई प्रवीण वनकर आई

मुलगा डिप्रेशन मध्ये आहे...
माझ्या मुलाला प्राचार्याने सर्व मुलांच्या समोर वर्गातून ओढून आणून दंमदाटी करुण बेदम मारहाण केली आहे. मुलांसमोर त्याचा अपमान झाल्याने तो डिप्रेशन मध्ये आहे.शाळेत जात नाही ...घाबरला आहे. त्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. त्याला योग्य न्याय मिळाला पाहिजे...
- प्रवीण खिमजी वनकर वडील रा.देवळा राज्य गुजरात. हल्ली मुकाम सिल्लोड.

शिक्षक नसल्याची केली होती तक्रार
10 विला एकूण 5 शिक्षक आहेत पैकी 3 शिक्षक नियमीत वर्गात क्लास घेतात..इतर इंग्रजी, हिस्ट्री, चे दोन्ही शिक्षक तीन चार दिवसा आड़ वर्गावर येतात यांची तक्रार मी व माझ्या पालकानी शाळेत आयोजित पालक मेळाव्यात केली. होती तेव्हा पासून मला धारेवर धरन्यात येत होते.. तो राग मनात धरून मला ही मारहाण करण्यात आली आहे.
- डेविड प्रवीणभाई वनकर पटेल. विद्यार्थी वर्ग 10 वी.

बळजबरी घेतला माफ़ी नामा
मी शाळेत कोणतेही गैर वर्तन केले नाही.. केवळ शाळेचा गणवेश घातला नव्हता... यामुळे मला अपमानित करून बेदम मारहाण केली. व उलट टीसी देण्याची धमकी देवून बळजबरी माफ़ी नामा लिहून घेतला.
- डेविड प्रवीणभाई वनकर पटेल. विद्यार्थी

मारले नाही... ओरडलो...
तो विद्यार्थी वर्गात अध्यापन करणाऱ्या शिक्षकां सोबत उद्धट पणे वागत होता... शिक्षकांच्या तक्रारी आल्याने मी वर्गात गेलो... त्याने माझ्या सोबत पण उद्दट पणा केला... मी त्याला वर्गातून समज देण्यासाठी माझ्या क्याबिन मध्ये आणले. मी त्याला मारले नाही... केवळ त्यांच्यावर ओरडलो...तुला टीसी देतो असे सांगितले ...त्याने माफ़ी मागितली व यानंतर असे वागनार नाही... सर्वांचा आदर करेल असे हमी पत्र लिहून दिले. त्यात त्याने ङ्मु्र्िरंल्ल३ लिहिल्याने मी विद्यार्थ्या समोर त्याचे स्वागत केले. इतर होत असलेले आरोप खोटे आहे.
- राहुलदेव भगत प्राचार्य जी.ए. शहा इंग्लिश स्कुल सिल्लोड.

https://www.dailymotion.com/video/x8458n1

Web Title: As a result of not wearing uniform, the student suffers from beating, video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.