दहावीचा निकाल जाहीर, कोकणचीच सरशी
By Admin | Published: June 8, 2015 04:34 PM2015-06-08T16:34:52+5:302015-06-08T16:34:52+5:30
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून राज्याचा एकूण निकाल ९१.४६ टक्के लागला आहे.
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. ८ - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे मार्चमध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून राज्याचा एकूण निकाल ९१.४६ टक्के लागला आहे. १२वीच्या निकालाप्रमाणेच दहावीच्या निकालातही कोकण विभाग ९६.५४ टक्क्यांसह अव्वल ठरला असून लातूर विभागाचा निकाल सर्वात कमी ८६.३८ टक्के इतका लागला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण ३.१४ टक्क्यांनी वाढले आहे. यंदाच्या निकालातही मुलींनी बाजी मारली असून ९२. ९४ टक्के विद्यार्थीनी तर ९०.१८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत, अशी माहिती बोर्डाच्या अधिका-यांनी दिली.
विद्यार्थ्यांना निकाल पुढील साईट्सवर ऑनलाइन पाहता येईल. www.mahresult.nic.in, www.maharashtraeducation.com, www.rediff.com/exams, www.knowyourresult.com/MAHSSC या संकेतस्थळांवर निकाल उपलब्ध असेल.
विभागनिहाय निकाल खालीलप्रमाणे
कोकण - ९६.५४ टक्के
कोल्हापूर - ९५.१२ टक्के
पुणे - ९५.१० टक्के
मुंबई - ९२.९० टक्के
नाशिक - ९२.१६ टक्के
औरंगाबाद - ९०.५७ टक्के
नागपूर - ८७.०१ टक्के
अमरावती - ८६.८४ टक्के
लातूर - ८६.३८ टक्के
अपंग विद्यार्थ्यांचा निकाल ८७.४६ टक्के लागला आहे. शंभर टक्के निकाल लागलेल्या शाळांची संख्या ४७३१ असून शून्य टक्के निकाल लागलेल्या शाळांची संख्या २१ आहे.