"बाजार समित्यांमधील निकाल म्हणजे महाराष्ट्रात 'त्यांचे' सरकार येणार नाही हे चित्र तयार करणारे"

By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2023 03:36 PM2023-05-01T15:36:03+5:302023-05-01T15:36:24+5:30

महाविकास आघाडीच्या वज्रमूठीची ताकद किती आहे हे समोर आलं असल्याचं पाटील यांचं वक्तव्य.

Results bajar samiti paint a picture that shiv sena bjp eknath shinde government will not come to Maharashtra jayant patil maharashtra day 1 may | "बाजार समित्यांमधील निकाल म्हणजे महाराष्ट्रात 'त्यांचे' सरकार येणार नाही हे चित्र तयार करणारे"

"बाजार समित्यांमधील निकाल म्हणजे महाराष्ट्रात 'त्यांचे' सरकार येणार नाही हे चित्र तयार करणारे"

googlenewsNext

“महाविकास आघाडी एकसंघ राहिल्यामुळे महाराष्ट्रात भाजपाची ताकद किती कमी आहे हे पुन्हा एकदा बाजार समितींच्या निवडणूकीतून महाराष्ट्रासमोर आले आहे. एकनाथ शिंदे हे चाळीस आमदार घेऊन गेले तरी त्यांना म्हणावे इतके यश मिळाले नाही याचा परिणाम हा भाजप आणि एकनाथ शिंदे एकत्रित आले तरी महाराष्ट्रात त्यांचे सरकार येणार नाही हे चित्र तयार करणारे आहे,” अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. जयंत पाटील यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी यावर भाष्य केलं.

“महाविकास आघाडीच्या बाजार समित्या एवढ्या मोठ्या प्रमाणात आल्या याचा अर्थ सहकारी क्षेत्रात सोसायटीत काम करणारे, मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते हे महाविकास आघाडीच्या बाजूने आहेत. त्यामुळे कितीही वल्गना भाजप व एकनाथ शिंदे यांनी केल्या तरी त्यांचे फार मोठ्या प्रमाणावर सदस्य निवडून आले असते. पण तसे चित्र दिसले नाही त्यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना यांचेच प्राबल्य या बाजार समित्यांमध्ये दिसले. त्यातून महाविकास आघाडीच्या वज्रमूठीची ताकद किती आहे हे समोर आले आहे,” असेही पाटील यांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना स्पष्ट केले.

सरकारच्यानुसत्याघोषणा
सरकारने घोषणा नुसत्या केल्या आहेत. सरकार शेतकऱ्यांच्या, शेतमजूरांच्या,ग्रामीण भागातील लोकांच्या प्रश्नांविषयी गंभीर नाही. फक्त इव्हेंट करणे आणि मोठमोठे कार्यक्रम करणे व लाखोंच्या संख्येने लोक आणणे त्यात काही लोकांचा मृत्यू झाला तरी या सरकारला याची तमा नाही. अशी मानसिकता सरकारची असल्याचा आरोपही त्यांनी केला.

तातडीनंबैठकाघ्या
“सरकारने अवकाळी पावसात अडकलेल्यांना दिलासा दिला नाही. आता हवामान खात्याने उद्यापासून पाऊस हजेरी लावणार आहे. त्यासाठी राज्य सरकार सज्ज झालेले दिसत नाही. जो शेतकरी संकटात आहे त्याच्याच नशीबी अवकाळी आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी सावरण्यासाठी सरकारने काही केलेच नाही. किमान पाऊस येणार हे माहीत असताना राज्यातील महसूल यंत्रणा, पोलीस, आरोग्य यंत्रणा सतर्क सरकारने ठेवली पाहिजे. त्यासाठी तातडीने बैठका घेतल्या पाहिजेत,” अशी मागणीही जयंत पाटील यांनी केली. 

पक्षवाढवण्याचाप्रत्येकाचाप्रयत्न 
आघाडीमध्ये जास्त संख्या त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र साधारण असते. आम्ही आघाडीत असलो तरी पक्ष वाढवण्याचा प्रयत्न प्रत्येक पक्षाचा असतो. त्या अनुषंगाने काही विधाने झालेली असतील. पण महाविकास आघाडी प्रयत्नांची शिकस्त करुन जास्तीत जास्त उमेदवार जिंकून आणण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Results bajar samiti paint a picture that shiv sena bjp eknath shinde government will not come to Maharashtra jayant patil maharashtra day 1 may

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.