दानवेंचे जावई पिछाडीवर तर लोणीकरांचे'जावई'बापू सहाव्या क्रमांकावर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2019 11:26 AM2019-10-24T11:26:13+5:302019-10-24T11:28:02+5:30
भाजपच्या दोन दिग्गज नेत्यांचे जावई एकाच मतदारसंघातून आमने-सामने आल्याने कन्नड विधानसभा मतदारसंघातील लढत चर्चेत आले होती.
मुंबई : विधानसभा निवडणुकांचे कल हाती येत असतानाचा राज्याचे लक्ष लागून असलेल्या कन्नड विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार उदयसिंग राजपूत १४ हजार ३४४ मतांनी आघाडीवर असून केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई पिछाडीवर तर पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांचे जावई किशोर पवार हे सहाव्या क्रमांकावर असल्याचे पाहायला मिळत आहे.
भाजपच्या दोन दिग्गज नेत्यांचे जावई एकाच मतदारसंघातून आमने-सामने आल्याने कन्नड विधानसभा मतदारसंघातील लढत चर्चेत आले होती. त्यामुळे या दोन्ही जावई मधून कोण बाजी मारणार याकडे सर्व राज्याचे लक्ष लागले आहे. मात्र हाती येत असलेल्या आकडेवारीनुसार कन्नडमधून शिवसनेचे उमेदवार दयसिंग राजपूत १४ हजार ३४४ मतांची आघाडी घेतली आहे.
तर दानवे यांचे जावई हर्षवर्धन जाधव हे दुसऱ्या क्रमांकावर असून लोणीकर यांचे जावई किशोर पवार थेट सहाव्या क्रमांकावर असल्याचे चित्र आहे. त्यामुळे भाजपच्या या दोन्ही दिग्गज नेत्यांचे जावई अडचणीत असल्याचे दिसत आहे.