महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या कलचाचणीचा निकाल शुक्रवारी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2020 06:54 PM2020-04-30T18:54:07+5:302020-04-30T18:56:43+5:30

कलचाचणीचा निकाल येत्या शुक्रवारी (दि.१) दुपारी एक वाजता राज्य मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध..

Results of the test conducted by the Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education on Friday | महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या कलचाचणीचा निकाल शुक्रवारी

महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या कलचाचणीचा निकाल शुक्रवारी

Next
ठळक मुद्देविद्यार्थ्यांना आपल्या आवडीचे क्षेत्र करिअरसाठी निवडणे सोपे जाणार

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या कलमापन व अभिक्षमता चाचणीचा निकाल येत्या शुक्रवारी (दि.१) दुपारी एक वाजता राज्य मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिला जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या आवडीचे क्षेत्र करिअरसाठी निवडणे सोपे जाणार आहे.
राज्य मंडळातर्फे राज्यातील २२ हजार ४७८ शाळांमधून इयत्ता दहावीच्या १५ लाख ७६ हजार ९२६ विद्यार्थ्यांची कल अभिक्षमता चाचणी मोबाईल आणि संगणकाच्या माध्यमातून घेण्यात आली. विद्यार्थ्यांचा कृषी, कला, वाणिज्य ,ललित कला, आरोग्य व जैविक विज्ञान ,तांत्रिक, गणवेशधारी आदी क्षेत्रातील कल जाणून घेण्यात आला.त्यात १९.३. टक्के विद्यार्थ्यांनी सात कल क्षेत्रापैकी गणवेशधारी सेवा आणि १७.७. टक्के विद्यार्थ्यांनी ललित कला या क्षेत्राला पहिले प्राधान्य दिले आहे. तसेच गणवेशधारी या क्षेत्राला २० टक्के मुलांनी पहिले प्राधान्य तर १९.८ टक्के मुलींनी ललित कला या क्षेत्राला पहिले प्राधान्य दिले आहे. त्याचप्रमाणे १६.१ टक्के विद्यार्थ्यांनी वाणिज्य या क्षेत्राला दुसरे प्राधान्य दिले आहे. राज्यातील नऊ विभागांपैकी सहा विभागांमध्ये गणवेशधारी सेवा व दोन विभागांमध्ये ललित कला या क्षेत्राला पहिले प्राधान्य आहे तसेच नऊपैकी आठ विभागांमध्ये वाणिज्य या कलक्षेत्रा ला सर्वात जास्त दुस?्या क्रमांकाचे प्राधान्य दर्शविले आहे., असे राज्य मंडळातर्फे कळविण्यात आले आहे.

Web Title: Results of the test conducted by the Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education on Friday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.