‘नीट’बाबत फेरविचार!
By Admin | Published: May 12, 2016 04:38 AM2016-05-12T04:38:23+5:302016-05-12T04:38:23+5:30
एमबीबीएस प्रवेश परीक्षा प्रादेशिक भाषांमधून घेण्याची मागणी लोकसभेत सर्व खासदारांनी पक्षभेद बाजूला सारत केली. या वर्षापासून केवळ एकच राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (नीट) घेण्याच्या सर्वोच्च
नवी दिल्ली : एमबीबीएस प्रवेश परीक्षा प्रादेशिक भाषांमधून घेण्याची मागणी लोकसभेत सर्व खासदारांनी पक्षभेद बाजूला सारत केली. या वर्षापासून केवळ एकच राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (नीट) घेण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावरही त्यांनी नाराजी व्यक्त केली. संसदीय कार्यमंत्री व्यंकय्या नायडू यांनी ‘नीट’बाबत सरकार फेरविचार करेल, असे आश्वासन दिले.
देशभरातील विद्यार्थ्यांनी ‘नीट’ परीक्षेवर आक्षेप घेतल्याने सरकारने त्यावर गांभीर्याने विचार चालविला आहे. आवश्यकता भासल्यास दुसऱ्यांदा सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले जाईल. या वर्षापासून ‘नीट’ परीक्षा घेणे शक्य नसून, त्यासाठी आणखी मुदत देण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाची समजूत घालण्याचा प्रयत्न केला जाईल, असे नायडू म्हणाले.
एमबीबीएस आणि बीडीएस ( दंत वैद्यक) अभ्यासक्रमासाठी एकच समान प्रवेश परीक्षा घेण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने गेल्या महिन्यात केंद्र सरकार आणि सीबीएसईला दिला होता. शून्य तासाला ‘नीट’ परीक्षेचा मुद्दा उपस्थित करताना सदस्यांनी याबाबत एक वटहुकूम जारी करण्याची मागणी केली होती.