आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांचं सेवानिवृत्ती वय आता ६२ वर्ष; ठाकरे मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2021 05:25 PM2021-07-14T17:25:16+5:302021-07-14T18:03:47+5:30
कोरोना महामारीमुळे महाराष्ट्रालाही मोठा फटका बसला आहे. यात आरोग्य कर्मचाऱ्यांचा अभाव दिसून आला.
मुंबई – मागील एक वर्षापासून संपूर्ण जगावर कोरोना महामारीचं संकट उभं राहिलं आहे. या महामारीनं लाखो लोकांचा बळी घेतला आहे. कोरोना काळात आरोग्य विभागातील त्रुटींची प्रखरतेने जाणीव झाली. अपुऱ्या आरोग्य सुविधेमुळे अनेकांचे प्राण गेले. कोरोना महामारीनं आरोग्य या विषयाकडे बघण्याचा दृष्टीकोनच बदलून टाकला. त्यामुळे अनेक देश आरोग्य सुविधा वाढवण्यावर भर देत आहेत.
कोरोना महामारीमुळे महाराष्ट्रालाही मोठा फटका बसला आहे. यात आरोग्य कर्मचाऱ्यांचा अभाव दिसून आला. अनेक पदं रिक्त असल्याने सक्रीय कर्मचाऱ्यांवर ताण पडला. कोरोना काळात आरोग्य विभागातील अधिकारी निवृत्त होत आहे. त्यामुळे ठाकरे सरकारने आजच्या कॅबिनेट बैठकीत याच संदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. आरोग्य विभागाच्या वैद्यकीय अधिकारी आणि वरिष्ठ अधिकारी यांचे सेवानिवृत्तीचे वय ६२ वर्षापर्यंत वाढविण्यास कार्योत्तर मान्यता आजच्या बैठकीत देण्यात आली आहे.
"UPSC च्या धर्तीवर MPSC परीक्षांचेही वेळापत्रक जाहीर करणार" #MPSChttps://t.co/kGjajcDjbt
— Lokmat (@MiLOKMAT) July 14, 2021
आजच्या मंत्रिमंडळात ठाकरे सरकारने घेतलेले निर्णय
राज्याच्या साहसी पर्यटन धोरणास मान्यता
राज्यातील सार्वनिक उपक्रमातील कर्मचाऱ्यांना ७ व्या वेतन आयोगाप्रमाणे सुधारीत वेतनश्रेणी देण्यासाठी निकष निश्चित करणार
कोविड सादरीकरण
उत्पादनांवर परिणाम होऊ देणार नाही - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
आज सुमारे १३०० मेट्रिक टन ऑक्सिजन उत्पादन राज्यात केले जाते. येणाऱ्या काळात कोव्हीडचे आव्हान अधिक वाढले तर ऑक्सिजनची मागणी दुसऱ्या लाटेपेक्षा देखील अधिक भासू शकते. त्यामुळे ऑक्सिजन निर्मितीबरोबरच ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणावर साठा करून ठेवणे, त्यासाठी टँक्स, सिलिंडरची आवश्यकता आहे.उद्योगांनी त्यांच्या कामगार व कर्मचाऱ्यांचे लसीकरण मोठ्या प्रमाणावर करून घ्यावे. आजमितीस केंद्राने दिलेला २५ लाख डोसेसचा साठा खासगी रुग्णालयांकडे आहे. तो मोठ्या प्रमाणावर वापरला गेला पाहिजे. छोट्या मोठ्या उद्योगांमध्ये कोविडपासून प्रभावित न होणारी बायो बबल यंत्रणा निर्माण करून त्यामाध्यमातून आरोग्याचे नियम पाळून सुरक्षित उत्पादन सुरू ठेवता आले पाहिजे. काटेकोर निर्बंध लावावे लागले तर उत्पादनावर परिणाम होऊ नये म्हणून कामगारांच्या निवासासाठी कंपनीच्या परिसरात किंवा जवळपास फिल्ड निवास व्यवस्था उभारण्याच्यादृष्टिने नियोजन करावे, कामांच्या पाळ्या अशारीतीने निश्चित कराव्यात की, गर्दी होणार नाही व कुठल्याच सुविधेवर ताण येणार नाही हे पाहावे असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अलीकडेच झालेल्या बैठकीत म्हटलं होतं.