मातंग समाजाचे ८ हजार कोटी परत द्या
By admin | Published: July 16, 2015 12:29 AM2015-07-16T00:29:30+5:302015-07-16T00:29:30+5:30
नुसूचित जातींसाठी केंद्र सरकारने विशेष घटक योजनेअंतर्गत पाठवेलल्या २१ हजार कोटींमधील ८ हजार कोटींचा निधी राज्य सरकारने इतरत्र वळवल्याचा आरोप अखिल
मुंबई : अनुसूचित जातींसाठी
केंद्र सरकारने विशेष घटक योजनेअंतर्गत पाठवेलल्या २१ हजार कोटींमधील ८ हजार कोटींचा निधी राज्य सरकारने इतरत्र वळवल्याचा आरोप अखिल भारतीय मातंग संघाने केला आहे.
त्यामुळे मातंग समाजाच्या वाट्याचे ८ हजार कोटी रुपये सरकारने
परत देण्याची मागणी संघाचे
अध्यक्ष बाबासाहेब गोपले यांनी
केली आहे. गोपले म्हणाले की
मातंग आरक्षणासाठी संघाचे
गेल्या दोन वर्षांहून अधिक काळापासून
आंदोलन सुरू आहे. मात्र
स्वतंत्र आरक्षणाच्या मुद्द्याबाबत पावले उचलली नसून, सरकारने समाजाच्या विकासाचा निधीही
इतरत्र वळवला आहे. त्यामुळे सरकारविरोधात तीव्र आंदोलनाशिवाय पर्याय नाही.
येत्या २८ जुलैला सरकारविरोधात मातंग समाज महामोर्चा काढून निषेध व्यक्त करणार आहे. आझाद मैदानावर काढण्यात येणाऱ्या या आंदोलनात केंद्राचा निधी समाजाच्या विकासासाठी १००% वापरण्याची मागणी करण्यात येईल. शिवाय अनुसूचित जातीमधील मातंग समाजाला ८% स्वतंत्र आरक्षण देण्याची तरतूद करण्याचे आवाहनही करण्यात येणार आहे.