‘मोरारजी देसार्इंना दिलेले ‘भारतरत्न’ परत घ्या’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2017 01:33 AM2017-01-29T01:33:29+5:302017-01-29T01:33:29+5:30

माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांना १९९१ मध्ये सरकारने दिलेला देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘भारतरत्न’ मागे घ्यावा.

Return 'Bharat Ratna' given to Morarji Desai | ‘मोरारजी देसार्इंना दिलेले ‘भारतरत्न’ परत घ्या’

‘मोरारजी देसार्इंना दिलेले ‘भारतरत्न’ परत घ्या’

googlenewsNext

मुंबई : माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांना १९९१ मध्ये सरकारने दिलेला देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘भारतरत्न’ मागे घ्यावा.
देसार्इंनी त्यांच्या कारकिर्दीत नेहमीच ‘भारतरत्न’ व ‘पद्म’ पुरस्कारांना विरोध केला. त्यामुळे त्यांना देण्यात आलेला पुरस्कार मागे घ्यावा, अशी मागणी एका वकिलाने याचिकेद्वारे उच्च न्यायालयात केली आहे.
मोरारजी देसार्इंनी त्यांच्या ‘स्टोरी आॅफ माय लाइफ’ या आत्मचरित्रात ‘पद्म’ व ‘भारतरत्न’ पुरस्काराला त्यांचा विरोध असल्याचा उल्लेख केला आहे. या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेल्या काही दिग्गजांनी त्याचा गैरवापर केल्याचेही देसाई यांनी आत्मचरित्रात नमूद केले आहे.
याचाच आधार घेत, याचिकाकर्त्या वकिलांनी देसाई ‘दुटप्पी’ असल्याचे म्हणत, त्यांना दिलेला ‘भारतरत्न’ मागे घेण्याची मागणी याचिकेद्वारे केली आहे.
‘भारतरत्न’ व ‘पद्म’ पुरस्कारांना विरोध करणाऱ्या व पंतप्रधान पद भूषवत असताना, हे पुरस्कार स्थगित करणाऱ्या मोरारजी देसार्इंनी १९९१ मध्ये ‘भारतरत्न’ व पाकिस्तानचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘निशान-ए-पाकिस्तान’ स्वीकारला. असे म्हणत सरकारने त्यांना दिलेला सर्वोच्च नागरी पुरस्कार मागे घ्यावा,’ अशी मागणी व्यवसायाने वकील असलेले धनंजयसिंग जगताप यांनी केली
आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Return 'Bharat Ratna' given to Morarji Desai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.