राज्यातील १५ जिल्ह्यात ऑक्टोबर कोरडाच; परतीच्या पावसाने दिला दगा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2018 09:01 PM2018-10-31T21:01:47+5:302018-10-31T21:17:58+5:30

मराठवाड्यासह राज्यातील जवळपास २२ जिल्ह्यात पावसाळ्याच्या चार महिन्यातच सरासरीपेक्षा खूप कमी पाऊस झाला होता़.

Returning rain not fall down in 15 districts of the state | राज्यातील १५ जिल्ह्यात ऑक्टोबर कोरडाच; परतीच्या पावसाने दिला दगा

राज्यातील १५ जिल्ह्यात ऑक्टोबर कोरडाच; परतीच्या पावसाने दिला दगा

ठळक मुद्दे९ जिल्ह्यात परतीचा किरकोळ पाऊसपरतीच्या पावसाने पाठ फिरविल्याने राज्यात मोठ्या प्रमाणावर पाणीटंचाईयंदा बंगालच्या उपसागरात असे कमी दाबाचे क्षेत्रच तयार झाले नाही़ त्याचा फटका ओलावा जमिनीत नसल्याने अनेक ठिकाणी रब्बी हंगामही धोक्यात

पुणे : राज्यात जवळपास सर्व ठिकाणी परतीचा पाऊस न झालाच नाही़. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रातील १५ जिल्ह्यात आॅक्टोबर महिना संपूर्णपणे कोरडा गेला तर ९ जिल्ह्यात केवळ तुरळक ठिकाणी पाऊस झाला़. परतीच्या पावसाने दगा दिल्याने राज्यात सर्वत्र पाणी टंचाई निर्माण झाली असून रब्बीच्या लागवडीसाठी आवश्यक असलेला ओलावा जमिनीत नसल्याने अनेक ठिकाणी रब्बी हंगामही धोक्यात आला आहे़. 
मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरु झाल्यानंतर बंगालच्या उपसागरात अनेकदा कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो व त्याचा फायदा मराठवाडा, सोलापूर, मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना होत असतो़ .या पावसामुळे जमिनीत ओलावा निर्माण होऊन त्याचा फायदा रब्बीच्या पिकांना होतो़. 
पण यंदा सप्टेंबरमध्ये केवळ एकदाच बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला़. पण तो ईशान्य भारताकडे गेल्याने मध्य भारत, महाराष्ट्राला त्याचा फायदा झाला नाही़. यंदा परतीचा पाऊस होण्याची शक्यता नाही असा अंदाज हवामान विभागाने आधीच व्यक्त केला होता़. 
मराठवाड्यासह राज्यातील जवळपास २२ जिल्ह्यात पावसाळ्याच्या चार महिन्यातच सरासरीपेक्षा खूप कमी पाऊस झाला होता़. त्यात आॅक्टोंबरमध्ये हमखास पडणाऱ्या परतीच्या पावसाने पाठ फिरविल्याने राज्यात मोठ्या प्रमाणावर पाणीटंचाई झाली असून अनेक ठिकाणी रब्बीच्या लागवडीसाठी आवश्यक असलेला जमिनीतील ओलावाही कमी झाला आहे़. 
नागपूर, भंडारा, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, जळगाव, नंदूरबार, बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, नांदेड, हिंगोली, वाशीम, परभणी या १५ जिल्ह्यात आॅक्टोंबर महिना कोरडा ठणठणीत गेला़. याशिवाय पालघर ९१ टक्के, ठाणे ९२ टक्के, मुंबई उपनगर ९५ टक्के, अहमदनगर ९४ टक्के, औरंगाबाद ९७ टक्के, जालना ९८ टक्के, बीड ९२ टक्के, गोंदिया ९९ टक्के, धुळे ९९ टक्के या जिल्ह्यात अतिशय किरकोळ पाऊस झाला़. 
याशिवाय बाकी जिल्ह्यांमध्येही थोडा फार पाऊस झाला असला तरी कोणत्याही जिल्ह्यामध्ये आॅक्टोंबरमध्ये पडणाऱ्या पावसाच्या सरीसरी इतका पाऊस कोठेही झाला नाही़. त्याचा परिणाम संपूर्ण राज्यातील पाणीसाठ्यावर झाला असून आगामी रब्बी हंगामावर होण्याची शक्यता आहे़.
.........
बंगालच्या उपसागरात आॅक्टोबरमध्ये मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरु होतो, तेव्हा कमी दाबाचे क्षेत्र तयार होते़. त्याचा फायदा मध्य भारताला होत असतो़. पण यंदा बंगालच्या उपसागरात असे कमी दाबाचे क्षेत्रच तयार झाले नाही़ त्याचा फटका बसला आहे़. हवामान विभागाने याचा अंदाज अगोदरच व्यक्त केला होता़. 
डॉ़ जीवनप्रकाश कुलकर्णी, हवामानशास्त्रज्ञ

Web Title: Returning rain not fall down in 15 districts of the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.