घर खरेदी-विक्रीतून २६ हजार कोटींचा महसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2018 04:53 AM2018-04-02T04:53:26+5:302018-04-02T04:53:26+5:30
राज्य शासनाकडून नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाला देण्यात आलेल्या कर वसुलीचे उद्दिष्ट नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक कार्यालयातर्फे (आयजीआर) पूर्ण करण्यात आले आहे. नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने २७ मार्चपर्यंतच २०१७-१८ या आर्थिक वर्षात आतापर्यंतचा सर्वाधिक २५ हजार ६८० कोटी रुपयांचा महसूल जमा केला आहे.
पुणे राज्य शासनाकडून नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाला देण्यात आलेल्या कर वसुलीचे उद्दिष्ट नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक कार्यालयातर्फे (आयजीआर) पूर्ण करण्यात आले आहे. नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने २७ मार्चपर्यंतच २०१७-१८ या आर्थिक वर्षात आतापर्यंतचा सर्वाधिक २५ हजार ६८० कोटी रुपयांचा महसूल जमा केला आहे.
एकीकडे बांधकाम क्षेत्रात बंदी असल्याचे बोलले जात असले तरी दुसरीकडे घर व जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारांत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. विभागाला यंदा २१ हजार कोटी रुपयांच्या महसुलाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. ते जानेवारीच पूर्ण झाले.
दस्तनोंदकडे कल
नोंदणी व मुद्रांक विभागाकडे दस्तनोंदणी करण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे. वाढीव दोन हजार कोटींचे उद्दिष्ट ही पूर्ण केले आहे. ३१ मार्चपर्यंत २६ हजार कोटींपेक्षा जास्त महसूल जमा झालेला दिसून येईल, असे सहायक नोंदणी महानिरीक्षक जी. डी. गीते यांनी सांगितले.