संघावरील टीकेमुळे महसूलमंत्री भडकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2018 04:57 AM2018-03-06T04:57:21+5:302018-03-06T04:57:21+5:30
भाजपा आणि संघ परिवाराच्या विचारधारेवर विरोधकांकडून सातत्याने होणाºया टीकेमुळे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांचा सोमवारी अक्षरश: पारा चढला. पाटील यांना शांत करण्यासाठी संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट, परिवहनमंत्री दिवाकर रावते, कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, राज्यमंत्री रणजीत पाटील तसेच शेकाप नेते जयंत पाटील, राष्ट्रवादीचे सुनील तटकरे, जयंत जाधव आदींनी प्रयत्न केला.
भाजपा आणि संघ परिवाराच्या विचारधारेवर विरोधकांकडून सातत्याने होणाºया टीकेमुळे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांचा सोमवारी अक्षरश: पारा चढला. पाटील यांना शांत करण्यासाठी संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट, परिवहनमंत्री दिवाकर रावते, कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, राज्यमंत्री रणजीत पाटील तसेच शेकाप नेते जयंत पाटील, राष्ट्रवादीचे सुनील तटकरे, जयंत जाधव आदींनी प्रयत्न केला. स्वत: सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनीही चंद्रकांतदादांना शांत होण्याचे आवाहन केले. कपिल पाटील यांच्या वक्तव्यातील विचारधारेचा विषय तपासून कामकाजातून काढून टाकले जाईल, असेही सभापती म्हणाले. मात्र, चिडलेले चंद्रकांतदादा शांत होण्याची कोणतीच चिन्हे नव्हती. सभागृहातील या वातावरणामुळे सभापतींनी कामकाज तहकूब केले.
दादांनी धमकावले - कपिल पाटील यांचा आरोप
मुंबई : आमदार प्रशांत परिचारक यांच्या निलंबनाबाबत प्रश्न विचारल्याने महसूलमंत्री चंद्रकांत पाटील आपल्या अंगावर धावून आले, त्यांनी ‘तुझी औकात काय, तुला बघून घेईन', अशी धमकी दिल्याचा आरोप शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी केला आहे.
प्रशांत परिचारकांनी जो शब्दप्रयोग केला, ती परंपरा या सरकारला मान्य आहे का, हा माझा प्रश्न आहे. त्याचा खुलासा सरकारने करावा. या विचारधारेचे ते समर्थन करतात की नाही, हे सरकारने स्पष्ट करावे. ते स्पष्ट करण्याऐवजी ज्याप्रमाणे चंद्रकांतदादा सभागृहात भाषा वापरत होते, ते खेदजनक आणि वेदनाजनक असल्याचे कपिल पाटील म्हणाले. ‘चंद्रकांतदादा अक्षरश: माझ्या अंगावर धावून आले. त्यांना दोन ते तीन मंत्र्यांनी पकडून ठेवले. तुला बघून घेतो, बदडून काढतो, अशी धमकी राज्याचे महसूलमंत्री देत असतील, तर परिस्थिती गंभीर आहे, असेही कपिल पाटील म्हणाले.
विधिमंडळात घडलेल्या या घटनेचे स्वत: सभापती आणि सर्व आमदार साक्षीदार आहेत. त्यामुळे इतके गंभीर वर्तन करणाºया चंद्रकांत पाटील यांनी आत्मपरीक्षण करावे आणि दिलगिरी व्यक्त करावी. लोकशाहीत प्रत्येकाला आपले म्हणणे मांडण्याचा अधिकार आहे. मात्र अशा पद्धतीने आवाज दाबण्याचा प्रयत्न सरकारकडून होणार असेल तर ते अधिक गंभीर आहे, असे कपिल पाटील म्हणाले.
खोटारडेपणा उघड - चंद्रकांत पाटील यांचा पलटवार
मुंबई : कपिल पाटील ऊठसूट आमच्या विचारधारेवर बोलत असतात. प्रशांत परिचारक प्रकरणात नेमलेल्या उच्चाधिकार समितीत कपिल पाटील यांनी वेगळी भूमिका घेतली आणि आता सभागृहात भलतेच सांगत आहेत. समितीच्या बैठकीत निलंबन मागे घ्या म्हणायचे आणि सभागृहात मात्र नेमके उलट बोलायचे? या विरोधाभासाला माझा आक्षेप आहे. या प्रकरणी कपिल पाटील यांचा खोटारडेपणा उघड झाला आहे, असा पलटवार चंद्रकांत पाटील यांनी केला.
प्रशांत परिचारक यांनी सैनिकांबद्दल जे अपशब्द उच्चारले त्याबद्दल मी त्यांची निंदा केली. परिचारक यांच्या निलंबनाचा प्रस्तावसुद्धा मीच मांडला होता. परिचारक सैनिकांबद्दल जे म्हणाले त्याचे कदापि समर्थन होऊ शकत नाही. स्वत: कपिल पाटील समितीत होते. जर एकमत झाले असेल तर कपिल पाटील आता सभागृहात कसे काय बोलू शकतात, असे ते म्हणाले.
आईवडिलांसमान असणा-या माझ्या विचारधारेला त्यांनी शिव्या घातल्या. तरीही कपिल पाटील यांना मी सन्माननीय सदस्य असेच संबोधन वापरले. प्रशांत परिचारक यांच्या वक्तव्याशी आम्ही सहमत नाही याची कल्पना असतानाही कपिल पाटील आरोप करत आहेत. या प्रकरणी ते खोटे बोलत असल्याचे उघड झाले आहे. परिचारक यांचा निर्णय सभापती अध्यक्ष असलेल्या समितीने घेतला. त्यामुळे कपिल यांनी हीरो बनण्याचा प्रयत्न करू नये.