महसूल अधिकार्‍यांचे होणार ‘मूल्य’मापन!

By admin | Published: May 15, 2014 02:57 AM2014-05-15T02:57:08+5:302014-05-15T04:22:43+5:30

अहमदनगर खासगी कंपन्यांमधील कर्मचार्‍यांप्रमाणेच सरकारी अधिकारी व कर्मचार्‍यांना आता ‘परफॉर्मन्स’ द्यावा लागणार आहे.

Revenue officials will get 'value' measurement! | महसूल अधिकार्‍यांचे होणार ‘मूल्य’मापन!

महसूल अधिकार्‍यांचे होणार ‘मूल्य’मापन!

Next

अशोक निंबाळकर, अहमदनगर खासगी कंपन्यांमधील कर्मचार्‍यांप्रमाणेच सरकारी अधिकारी व कर्मचार्‍यांना आता ‘परफॉर्मन्स’ द्यावा लागणार आहे. त्यावरच त्यांच्या ‘प्रगतीपुस्तका’चा आलेख अवलंबून राहील. ‘मूल्य’ घसरलेल्यांच्या सर्व्हिस बुकात तशी नोंद होईल. या ‘मूल्य’मापनाचा कामचुकारांनी चांगलाच धसका घेतला आहे. स्वमूल्यमापनाची ही पद्धत जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी जिल्हा प्रशासनात आणली आहे. त्यांनी पुणे जिल्हा परिषदेत सीईओ असताना असेच उपक्रम राबविले होते. प्रशासन गतिमान व्हावे आणि सर्वसामान्यांची पिळवणूक थांबावी हा त्यामागे उद्देश आहे. उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, अव्वल कारकून, सर्कल आणि तलाठ्यांनाही या मूल्यमापनास सामोरे जावे लागेल. १ जूनपासून त्यांच्या कामांचे मूल्यमापन होणार आहे. त्यासाठी त्यांना प्रशिक्षणही देण्यात आले आहे. एखाद्या कामासाठी किती वेळ, किती दिवस लागतील. त्यासाठी कोणती कागदपत्रे अपेक्षित आहेत. काम कोणत्या कार्यालयात होईल. याची माहिती नागरिकांना दिली जाईल. यासाठीही आराखडा तयार आहे. काम न झाल्यास संबंधित अधिकार्‍यास जाब विचारला जाणार आहे.

Web Title: Revenue officials will get 'value' measurement!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.