लंगडीपटू रेहान शेख याचा संशयास्पद मृत्यू
By Admin | Published: July 13, 2017 03:45 AM2017-07-13T03:45:45+5:302017-07-13T03:45:45+5:30
अनगाव येथील आंतरराष्ट्रीय लंगडीपटू रेहान शेख (१७) याचे आकस्मिक निधन झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वज्रेश्वरी : अनगाव येथील आंतरराष्ट्रीय लंगडीपटू रेहान शेख (१७) याचे आकस्मिक निधन झाले. पाण्याच्या टाकीवरून किंवा जिन्यावरून पडल्याने त्याचा मृत्यू झाला असे सांगण्यात येत असले, तरी त्याच्या मृत्यूबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.
बारावीत शिकणारा रेहान नवव्या वर्षापासून लंगडी खेळत होता. तेव्हापासून त्याने अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर ठाणे जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले होते. मध्य प्रदेशात राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली होती, तर जानेवारीत नेपाळ येथे झालेल्या दक्षिण आशियाई लंगडी स्पर्धेत भारतीय पुरु ष संघाचे नेतृत्व करत सुवर्णपदक पटकावले होते. आता त्याची सिंगापूर येथे होणाऱ्या आशियाई लंगडी स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली होती. त्याची सध्या तो तयारी करत होता. पण आकस्मिकरित्या त्याचा मृत्यू झाला. तो जिन्यावरून पडल्याचे सांगण्यात आले, तर काहींनी इमारतीवरून पडल्याचे सांगितले. रेहानच्या निधनाने भारतीय संघाचे अतोनात नुकसान झाल्याची भावना त्याचे प्रशिक्षक सागर भोईर यांनी व्यक्त केली.