प्रतिक्रियेचा विपर्यस्त अर्थ निघाला

By admin | Published: September 22, 2016 05:08 AM2016-09-22T05:08:19+5:302016-09-22T05:08:19+5:30

रामदास आठवले यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर, दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी सोशल मीडियावर जाहीर माफी मागितली आहे.

The reversal of the reaction has come out | प्रतिक्रियेचा विपर्यस्त अर्थ निघाला

प्रतिक्रियेचा विपर्यस्त अर्थ निघाला

Next


मुंबई : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर, दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी सोशल मीडियावर जाहीर माफी मागितली आहे. आपल्या प्रतिक्रियेचा विपर्यस्त अर्थ काढल्याने हा प्रकार घडल्याचा खुलासा नागराजने केला आहे.
या आधी ‘सैराट’ चित्रपटामुळे मराठा समाजाच्या मनात खदखद असल्याची टीका आठवले यांनी केली होती. त्यावर नागराजने हे गमतीशीर आहे, अशी प्रतिक्रिया दिली होती. मात्र, ‘सैराट’ला अनेकदा अतार्किक रितीने अनेक घटनांशी जोडले जात आहे. हे अत्यंत गमतीशीर आहे, असे प्रतिक्रियेत सांगायचे असल्याचा खुलासा नागराजने केला
आहे. संबंधित प्रतिक्रियेचा विपर्यस्त अर्थ निघाल्याबाबत नागराजने खेद व्यक्त केला आहे. शिवाय आठवले यांना फोन करून माफी मागितल्याचेही त्याने सोशल मीडियावर म्हटले आहे.
दरम्यान, घाटकोपर येथे नागराजविरोधात रिपाइंने बुधवारी तीव्र निदर्शने केली. हा गमतीचा विषय नसून, हिमतीचा विषय असल्याची प्रतिक्रिया रिपाइंने व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The reversal of the reaction has come out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.